नीलकांती पाटेकर सांगतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचे मार्केटिंग करणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 14:32 IST2017-01-19T14:32:17+5:302017-01-19T14:32:17+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव रंगत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक, कलाकार अशा अनेक दिग्गजांचे ...

नीलकांती पाटेकर सांगतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचे मार्केटिंग करणे आवश्यक
प णे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव रंगत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक, कलाकार अशा अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्यास मिळत आहेत. नुकतेच या महोत्सवात नीलकांती पाटेकर यांनी मराठी चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय मार्केट मिळविताना.. या विषयावर विचार मांडले. त्या म्हणाल्या, प्रत्येकाला चित्रपट बनविण्याची इच्छा आहे. मात्र यापुढे एक पाऊल टाकत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणी तितकास उत्साही दिसत नाही. दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आज देशभरात दीड ते दोन हजार चित्रपट महोत्सव होत असतात. मात्र आपण आपल्याच इथे होणा-या दोन तीन महोत्सवात अडकून बसतो आहोत. या मानसिकतेतून बाहेर येत चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचे मार्केटिंग करणे शक्य आहे मात्र ते कसं करावा याचीच माहिती आपल्याला नसते. तसेच चित्रपटात जर मोठा अभिनेता, अभिनेत्री आणि आयटम सॉंग असेल तरच ते आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होतात हा आपला समज चुकीचा आहे. खरं सांगू का चांगल्या कथेच्या आधारावर चित्रपट यशस्वी होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग मिळविण्यासाठी चित्रपटाची कथा, तंत्रज्ञान चांगले असावे लागते. आज परदेशातील तंत्रज्ञान हे तितक्याच किंमतीत किबहुना कमी किंमतीत उपलब्ध आहे त्यांचा जास्तीत जास्त निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्यासाठी निमार्ते आणि दिग्दर्शकांनी संयम ठेवावा, यश मिळते पण अनेकदा त्याला वेळ लागतो.