'नायक' अनिकेत विश्वासरावला टोळक्याकडून लाखोंचा गंडा,म्हणतो कसं जगायचं.... कुणी सांगेल का मला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:40 IST2018-03-31T10:10:03+5:302018-03-31T15:40:03+5:30

रुपेरी पडद्यावर कलाकार गुंडाची, टोळक्याची धुलाई करतात. फसवणूक करणा-यांची नायक यथेच्छ धुलाई करतो. सिनेमातील या सीन्सना टाळ्या मिळतात. चांगलंच ...

'Nayak' Aniket Vishwas, millions of people from the Ganges, say how to live .... Who knows me? | 'नायक' अनिकेत विश्वासरावला टोळक्याकडून लाखोंचा गंडा,म्हणतो कसं जगायचं.... कुणी सांगेल का मला?

'नायक' अनिकेत विश्वासरावला टोळक्याकडून लाखोंचा गंडा,म्हणतो कसं जगायचं.... कुणी सांगेल का मला?

पेरी पडद्यावर कलाकार गुंडाची, टोळक्याची धुलाई करतात. फसवणूक करणा-यांची नायक यथेच्छ धुलाई करतो. सिनेमातील या सीन्सना टाळ्या मिळतात. चांगलंच कौतुकही होतं. मात्र प्रत्यक्ष जीवनात हे नायक असो किंवा नायिका हे सुद्धा सर्वसामान्य माणूसच आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर जरी ते गुंड आणि टोळक्यांची धुलाई करत असले तरी प्रत्यक्ष जीवनात या कलाकारांचीही फसवणूक होते.सेलिब्रिटींची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. सेलिब्रिटींचं नाव, पैसा याचा वापर करुन त्यांची फसवणूक झाल्याची उदाहरणं आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची फसवणूक झाल्याचे समोर आलं होतं. आता याच फसवणूक झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव याची भर पडली आहे. एका टोळक्याने अनिकेत विश्वासरावला फसवल्याचे समोर आलं आहे. या टोळक्याने अनिकेतला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.मदतीच्या नावे लाखो रुपये उकळून या टोळीने पळ काढल्याचे अनिकेतने म्हटले आहे.खुद्द अनिकेतने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.एक मुलगी, मध्यमवयीन पुरुष आणि कुरळ्या केसाचा मुलगा असं हे टोळकं असून ते आधी सावज हेरतात. यानंतर सावजाकडे हे टोळकं मदतीसाठी याचना करतं.एनजीओ, कॅन्सरग्रस्तांना मदत करा अशी विविध कारणं देत ते पैसे उकळतात.अशा टोळ्यांपासून सावध रहा असं आवाहन अनिकेतने केले आहे.अशाप्रकारे फसवणूक झाली की भावना दुखावतात आणि माणुसकीवरील विश्वास उडतो असंही अनिकेतने नमूद केले आहे.आपली जशी फसवणूक झाली तशी कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी फेसबुकच्या माध्यमातून आपबिती सांगत असल्याचे अनिकेतनं म्हटलं आहे.या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असून या फसवणूक प्रकरणी तपास सुरु असल्याचे अनिकेतने म्हटलं आहे.या तपासाबाबत काही कळल्यास पुन्हा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून समोर येऊ असेही अनिकेतनं सांगितले आहे.तोवर सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन त्याने नागरिकांना केले आहे. 

Web Title: 'Nayak' Aniket Vishwas, millions of people from the Ganges, say how to live .... Who knows me?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.