राजा परांजपे पुरस्काराने राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:50 IST2018-04-17T06:20:44+5:302018-04-17T11:50:44+5:30
अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, नाटक अशा सगळ्याच विभागांत राजा समजल्या जाणाऱ्या राजा परांजपे यांच्या प्रतिष्ठानातर्फे आयोजित होणाऱ्या राजा परांजपे ...
राजा परांजपे पुरस्काराने राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांचा गौरव
अ िनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, नाटक अशा सगळ्याच विभागांत राजा समजल्या जाणाऱ्या राजा परांजपे यांच्या प्रतिष्ठानातर्फे आयोजित होणाऱ्या राजा परांजपे महोत्सवाच्या नवव्या पर्वाची सुरूवात नुकतीच कोल्हापूरात झाली.दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी राजा परांजपे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात दिग्दर्शन विभागासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या ‘फेरारी की सवारी’ आणि ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमांची दखल घेत त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राजेश मापुसकर यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात बोलताना, “श्रीवर्धन ला आमचं थिएटर होतं जिथे आम्ही सगळी भावंडं मजा-मस्तीबरोबरच या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत होतो, असं राजेश मापुसकर म्हणाले. त्यानंतर घडलेला श्रीवर्धन ते मुंबई हा प्रवास आणि अॅड फिल्म्सनंतर 'फेरारी की सवारी','व्हेंटिलेटर' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन.ही सगळी वर्ष कोल्हापूरला येताना नजरेसमोरून ओझरती जात असल्याचं म्हणत.सिनेसृष्टीतील या राजाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मानकरी ठरल्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार मानले. तर यावेळी निर्मितीताईंबरोबर केलेल्या नाटकाच्या आठवणींनाही उजाळा मिळाल्याचं दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी म्हटलं.” दरम्यान राजा परांजपे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित नवव्या राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन आणि राजा परांजपे सन्मान पुरस्कार वितरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्याबरोबरच अभिनेते संजय नार्वेकर, संगीतकार-गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री निर्मिती सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. तर जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांची निवड झाली असून 20 एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या राजा परांजपे जयंतीनिमित्त त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.14 एप्रिल ते 20 एप्रिल चालणाऱ्या या महोत्सवात राजा परांजपे यांचे 10 चित्रपट आणि 7 सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित दि मेन हू किल्ड गांधी (The Men who killed Gandhi) या पुस्तकात उल्लेखलेल्या घटना आणि गांधींच्या हत्येवेळी भारतातील परिस्थिती यांचं चित्रण असणार आहे. याविषयी बोलताना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत.