/> सलमान खान, हृतिक रोशन, जॉन इब्राहीम यांसारख्या सुपस्टारचे बाइक बद्दल असलेले खास प्रेम आपल्याला माहिती आहेतच. परंतू मराठीत नव्हे तर बॉलिवूड मध्ये आपल्या उतकृष्ठ अभिनयाने सर्वसामान्यांच्या मनात विशेष घर निर्माण करणाºया नानांना सुद्धा बाइक चालवायला फार आवडे हे तुम्हाला माहित होते का... तसेच नानांच्या चाहत्यांनी नानांना कधी बुलेट चालवताना पाहिली आहेत का .. नाही ना. सध्या सोशलमिडीयावर नानांचा बाइक चालवतानाचा फोटो सोशलमिडीयावर चांगलाच झळकत आहे. या फोटो मध्ये नाना कूल लूक मध्ये दिसत आहेत. त्यांनी खाकी रंगाचे जॅकेट, गॉगल, गळ््यात लॉकेट व त्यांच्या पेहराव्याला शोभेल असे लेदर शूज घातले आहेत. हा त्यांचा हॉट लूक एखाद्या तरू णाला कॉमप्लेक्स देईल यात काही शंकाच नाही हे नक्की. इतर चित्रपटसृष्टीतील सुपस्टारप्रमाणे याही सुपस्टारला बाइक चालवण्याच मोह आवरता आला नाही.