शेंटिमेंटल टीमचा विश्वास नांगरे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 12:24 IST2017-07-22T04:55:04+5:302017-07-22T12:24:14+5:30

शेंटिमेंटलमधील पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव म्हणजेच विकास पाटील याला रिअल लाइफमध्ये पण युनिफॉर्मची खूप क्रेझ होती. पण या क्रेझवर ...

Nangre Patil's faith in the tentative team | शेंटिमेंटल टीमचा विश्वास नांगरे पाटील

शेंटिमेंटल टीमचा विश्वास नांगरे पाटील

ंटिमेंटलमधील पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव म्हणजेच विकास पाटील याला रिअल लाइफमध्ये पण युनिफॉर्मची खूप क्रेझ होती. पण या क्रेझवर त्याच्यातील अभिनेत्याने मात केली आणि मराठी चित्रपटसृष्टीला चॉकलेट हिरो मिळाला. पण आता त्याची ही युनिफॉर्मची क्रेझ शेंटिमेंटल या चित्रपटाद्वारे पूर्ण होत आहे. सध्या प्रत्येक तरुणाला आपण विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा फीट अँड फाईन, जनतेच्या प्रश्नांची माहिती असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी बनावे असे वाटत आहे. गुड लूक्स, पोलिस खात्याबद्दल वाटणारी तळमळ, महत्त्वकांक्षी असा सुभाष जाधव म्हणजे शेंटिमेंटलमधला विश्वास नांगरे पाटील आहे. 
विकास पाटील हा मुळचा कोल्हापूरचा असला तरी त्याने त्याचे शिक्षण पुण्यात केले आहे. चार दिवस सासूचे या मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. लेक माझी लाडकी, कुलवधू, असंभव यांसारख्या मराठी तर मिसेस. तेंडुलकर या हिंदी मालिकेतही त्याने काम केले आहे. त्यानंतर तुकाराम या चित्रपटातही त्याने एक भूमिका साकारली होती. हमिदाबाईची कोठी या नाटकात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. विकासने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 
अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई.सी.एम. पिक्चर्स निर्मित, आर.आर.पी कॉर्पोरेशन, बनी डालमिया प्रस्तुत शेंटिमेंटल या चित्रपटात अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुबीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोती, राजन भिसे, विद्याधर जोशी यांची मुख्य भूमिका असून हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Also Read : अशोक सराफ आणि समीर पाटील यांच्या भन्नाट टायमिंगने महाराष्ट्र होणार शेंटिमेंटल

Web Title: Nangre Patil's faith in the tentative team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.