नाना पाटेकर यांनी केले राज ठाकरे यांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:07 IST2016-12-28T17:06:16+5:302016-12-28T17:07:34+5:30
नाशिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनचा लोकापर्ण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी प्रेक्षकांचे लाडके अभिनेते नाना पाटेकर, ...

नाना पाटेकर यांनी केले राज ठाकरे यांचे कौतुक
न शिकमध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनचा लोकापर्ण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी प्रेक्षकांचे लाडके अभिनेते नाना पाटेकर, भरत जाधव, पुष्कर क्षोत्री आणि दिग्दर्शक केदार शिंदेही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी नाना पाटेकर हे आपल्या खास शैलीत म्हणाले, राज जे करतो ते पराकोटीचं चांगल असतं. अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी यांचं कौतुक केले आहे. तसेच माणूस म्हणून मी राज यांचा आभारी आहे. त्याने खूप छान काम केले आहे. अजूनही कुठल्या शहरात तू निवडून आला तर बर होईल. अशी छान काम तिथेही होतील. असं म्हणत नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंच्या कामाची प्रशंसा केली. नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या खास शैलीत ओळखले जातात. त्यांचे अभिनय आणि सामाजिक कार्याचे चाहते मोठया प्रमाणावर पाहायला मिळत असतात. त्यांनी त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सामाजिक कार्यातदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांनी बॉलिवुड आणि मराठी इंडस्ट्रील अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्यांनी मराठीमध्ये डॉ. प्रकाश आमटे, नटसम्राट असे अनेक चित्रपट दिले आहेत. तर बॉलीवुडमध्ये परींदा, क्रांतीवीर, अग्नीसाक्षी, राजनिती, अपहरण, अब तक छपन्न असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. तसेच नाना आणि अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक कार्यासाठी नाम संस्थेची स्थापना केली आहे. नानांच्या अभिनयाप्रमाणेच प्रेक्षक त्यांच्या सामाजिक कार्याच्यादेखील प्रेमात पडले आहे. आता नाना पाटेकर यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता महेश मांजरेकरदेखील झळकणार आहे.