रहस्यमय प्रेमकथेने वेढलेला पिंडदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 18:18 IST2016-06-17T12:48:48+5:302016-06-17T18:18:48+5:30
सध्या वेगवेगळ््या आशयाचे मराठी चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. कंटेन्ट हा आपल्या चित्रपटांचा मुख्या ...

रहस्यमय प्रेमकथेने वेढलेला पिंडदान
लंडनमध्ये राहणारा आशुतोष (सिद्धार्थ चांदेकर) व रुही (मनवा नाईक) हे दोघे ऐका न्युज चॅनेलमध्ये कामाला असतात. एकदा आशुच्या आईचा त्याला अचानक फोन येतो अन ती त्याला म्हणते आजीचे पिंडदान करण्यासाठी भारतात जा. त्याचवेळी बॉसकुडन आशुला सांगण्यात येते की पिंडदान नावाच्या डॉक्युमेटरीसाठी त्याला अन रुहीला भारतात जायचे आहे. रुही अगदी जीव ओतुन आशुवर प्रेम करीत असते पण ते फक्त एकतर्फीच. अशातच दोघे भारतात जातात. किर्लोस्करांच्या पुर्वीच्या वाड्यात म्हणजेच सध्याच्या राजपॅलेस हॉटेलमध्ये या दोघांची राहण्याची व्यवस्था होते. त्या हॉटेलमध्ये पाऊल ठेवताच आशुला काहीतरी वेगळे वाटते.
डॉक्युमेंटरी शुटसाठी दोघेही नंदिकेश्वरच्या घाटावर जातात. तिथे त्यांना समजते की एक म्हातारी बाई केवळ स्त्री आहे म्हणुन तिच्या मुलाचे पिंडदान करु शकत नाही. मग त्या बाईला हॉटेलचा नोकर तुकाराम रुद्र बाबांचा पर्याय सुचवतो अन हे रुद्र बाबा आहेत तरी कोण याची उत्सुकता रुही अन आशुला लागते आणि ते दोघेही थेट भेटतात रुद्र बाबांना. परंतू या रुद्र बाबांचा मौन व्रत असल्याने त्यांच्याशी काहीच संवाद होऊ शकत नाही. केवळ त्यांच्या भेटीसाठी हे दोघे थांबतात. रुही एकीकडे आशुच्या प्रेमात अखंड बुडत जाऊन स्वत:ला झोकुन देते. पण ऐके दिेवशी आशुला मनगंगेच्या काठी अॅना (पॉला मॅगल्यम) भेटते अन सुरुवात होते या रहस्यमय प्रेमकथेला.
चित्रपटात एक रोमँटिक साँग सोडले तर बाकीची गाणी एकच गाणे रिपीट ऐकल्यासारखे भासते. परंतू पॉलाच्या तोंडुन येणारे मराठी संवाद ऐकताना तीचे खरोखर कौतुक वाटते. सिद्धार्थचा अॅक्टींगमधील तोच तो पण जाणवतो. तर मनवाला वेगळ््या रुपात पाहायला मिळते. अॅनाच्या प्रेमात पडलेला आशु इकडे आशुसाठी झुरणारी रुही अॅनाला दिसत असते. आशु जेव्हा अॅनाकडे प्रेमाचा इजहार करायला जातो तेव्हा समोर येते एक रहस्यमय गुढ. हा एक लव ट्रँगल जरी असला तरी ती टिपिकल लव्ह स्टोरी नाही. या चित्रपटातील लोकेशन्स पाहण्याजोगे आहेत. चित्रपटाच्या छायांकानी चित्रपटातील लोकेशन, कलाकार आदी गोष्टी योग्य टिपल्या आहेत. मध्यांतर पूवीर्चा चित्रपटाचा भाग पूर्णपणे प्रेमकथेवर आधारित असल्यामुळे तिथे चित्रपट रेंगाळतो. मात्र शेवटच्या २०-३० मिनिटांमध्ये चित्रपट पूर्णपणे वेगळं वळण घेतो. चित्रपटाच्या शेवटचा भागातील गूढ सुरुवातीपासून काही प्रमाणात दाखवला असता तर उत्सुकता अजून ताणली गेली असती. पिंडदान केल्याने माणसाला मुक्ती मिळते हा विचार आणि पिंडदान करण्यासाठी पण आजकाल पैसे घेतले जातात ही सद्यपरिस्थिती या चित्रपटात मांडली आहे. सर्वांनाच रुचेल आणि पटेल असा हा चित्रपट आहे. एका वेगळ्या पठडीतला चित्रपट अनुभवयाला काहीच हरकत नाही. एक इंटरेस्टींग विषय अन पिंडदानचे हे रहस्य जाणुन घेण्यासाठी नक्कीच हा सिनेमा पहावा.