संगीतकारांनी रंगवली मैफिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 13:15 IST2017-02-09T07:45:36+5:302017-02-09T13:15:36+5:30

आपुलकी  फौंडेशनच्या वतीने  पुण्यातील एस एम जोशी सभागृहात  नात तुझं माझं  ही मैफल  संपन्न झाली . गायक हर्षित अभिराज ...

Musicians concave concert | संगीतकारांनी रंगवली मैफिल

संगीतकारांनी रंगवली मैफिल

ुलकी  फौंडेशनच्या वतीने  पुण्यातील एस एम जोशी सभागृहात  नात तुझं माझं  ही मैफल  संपन्न झाली . गायक हर्षित अभिराज यांनी स्वरबध्द केलेली आणि ज्येष्ठ संगीतकारांची अजरामर गाणी या मैफिलीत मोठ्या  प्रतिसादात सादर झाली  शापित ,सर्जा , अरे संसार संसार , देवकीनंदन  गोपाला , अष्टविनायक अश्या  लोकप्रिय चित्रपटांचे   प्रसिद्ध दिग्दर्शक  राजदत्त  यांच्या  अनपेक्षित  आणि  सुखद  सहभागाने  या मैफिलीला रंगत आली .  ज्येष्ठ संगीतकार  बाबूजींच्या बरोबर काम करत असतानाच्या  आठवणींना  त्यांनी दिलेला उजाळा  हा नव्या कलाकारांसाठी प्रेरणादायी  होता .  दूरच्या रानात  सारख्या कविता चित्रपटाच्या  माध्यमातूनही  याव्यात असे मत व्यक्त करतानाच  , नात तुझं माझं  च्या संपूर्ण टीम ला त्यांनी शुभेच्छ्या दिल्या . या मैफिलीत नात्यांचा प्रवास उलगडणाºया आणि   हर्षित नि स्वरबद्ध केलेल्या  शान्ता शेळके , ना  धो महानोर , इलाही जमादार , प्रदीप निफाडकर , वैभव जोशी . जगदीश पिंगळे , प्रसाद कुलकर्णी , राघवेंद्र  यांच्या काव्यरचनाना  आणि ज्येष्ठ संगीतकारांच्या  संगीत रचनांना मोठा प्रतिसाद मिळाला . हर्षित  अभिराज यांच्या बरोबर   गायिका संयोगिता बादरायणी , गायक विशाल कलानी , रमेश कानडे यांनीही गीतांचे सादरीकरण केले , तर सूत्र संचालन  सुनंदा सुपनेकर यांनी केले . संकल्पना  धनंजय पुरकर यांची होती  ध्वनिलेखक  हेमंत उत्तेकर , रियाझ शेख , नागेश झलकी, चित्रे सर यांचेही  या मैफिलीला  सहकार्य लाभले

Web Title: Musicians concave concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.