गायिका योगिता होतेय संगीतकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:11 IST2016-01-16T01:06:00+5:302016-02-05T10:11:28+5:30
एक स्त्री संगीतकार असे म्हटले, की हातावर मोजण्याइतकीच नाव आपल्या डोळ्यांसमोर येतात. इशरत सुलताना आलियास बाबू, जड्डान बाई, सरस्वती ...

गायिका योगिता होतेय संगीतकार
ए स्त्री संगीतकार असे म्हटले, की हातावर मोजण्याइतकीच नाव आपल्या डोळ्यांसमोर येतात. इशरत सुलताना आलियास बाबू, जड्डान बाई, सरस्वती देवी, उषा खन्ना या त्यांपैकीच काही. नुकत्याच वैशाली सामंतदेखील संगीतकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. आता या सर्वांच्या यादीत अजून एका नावाची भर पडणार आहे. योगिता चितळे.. या गायिकेची. एका आगामी चित्रपटासाठी त्यांनी एक गाणे संगीतबद्ध केले आहे. योगिता चितळे यांनी आजवर अशोक पत्की, अजय अतुल, नीलेश मोहरीर अशा अनेक संगीतकारांसाठी आवाज दिला आहे. योगिता यांनी शालेय वयापासूनच संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आता संगीतक्षेत्रातील विश्व वाढविण्यासाठी चित्रपटांव्यतिरिक्त अल्बमसाठी संगीतकार बनायचे ठरवल्याचे त्या सांगतात. आता पहिल्यांदाच चित्रपटासाठी संगीत दिल्याचा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच असणार, हे काही सांगायला नको.