मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'नटवर्य केशवराव दाते' पुरस्कार दिलीप जाधव यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:44 IST2025-07-25T19:44:23+5:302025-07-25T19:44:37+5:30

रंगभूमी हीच कर्मभूमी मानत गेली अनेक वर्षे दिलीप जाधव यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. त्यांच्या नाट्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Mumbai Marathi Book Museum's 'Natwarya Keshavrao Date' Award announced for Dilip Jadhav | मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'नटवर्य केशवराव दाते' पुरस्कार दिलीप जाधव यांना जाहीर

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'नटवर्य केशवराव दाते' पुरस्कार दिलीप जाधव यांना जाहीर

रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत 'नटवर्य केशवराव दाते पुरस्कार' प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार अष्टविनायक या नाट्यनिर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव (Dilip Jadhav) यांना घोषित झाला आहे.

‘रंगभूमी हीच कर्मभूमी मानत गेली अनेक वर्षे दिलीप जाधव यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. त्यांच्या नाट्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार १ ऑगस्टला सायं ६.०० वा. शारदा मंगल सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.  

दिलीप जाधव म्हणाले...

या पुरस्काराबद्दल बोलताना दिलीप जाधव म्हणाले,  ''गेली ५३ वर्ष रंगभूमीची अविरत सेवा सुरु आहे. आतापर्यंत अनेक नाटकांना महाराष्ट्र शासन, झी गौरव, म.टा. सन्मान, आर्यन सन्मान असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या केशवराव दाते पुरस्काराचेही (नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत)  विशेष महत्त्व आहे.''

''माझ्यासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण आहे.''

''माझ्यासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण आहे. गेल्या ५३ वर्षात वर्षात मला ज्यांच्याकडून या रंगभूमीबद्दल थोडे शिकता आलं अशा नाट्य निर्मिती संस्था, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, पडद्यामागील मंडळी, असंख्य मित्र व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, त्यांची निवड समिती या सगळ्यांचा मी ऋणी आहे, आजवरच्या माझ्या कामाची दखल घेत हा महत्त्वाचा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. यापुढेही माझ्याकडून रंगभूमीची सेवा अविरत होत राहील हेच वचन देऊ शकतो'', अशी कृतज्ञता दिलीप जाधव यांनी व्यक्त केली.

Web Title: Mumbai Marathi Book Museum's 'Natwarya Keshavrao Date' Award announced for Dilip Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.