​कोड मंत्रच्या टीमने साजरा केला मुक्ता बर्वेचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:12 IST2017-05-17T08:42:00+5:302017-05-17T14:12:00+5:30

मुक्ता बर्वेने घडतंय बिघडतंय या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावरील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्याआधी आम्हाला वेगळे व्हायचे या नाटकात ...

Mukta Barve's birthday celebrated by the Mantra team | ​कोड मंत्रच्या टीमने साजरा केला मुक्ता बर्वेचा वाढदिवस

​कोड मंत्रच्या टीमने साजरा केला मुक्ता बर्वेचा वाढदिवस

क्ता बर्वेने घडतंय बिघडतंय या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावरील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्याआधी आम्हाला वेगळे व्हायचे या नाटकात काम केले होते. मुक्ताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून तिची छाप सोडली आहे. तिच्या पहिल्याच मालिकेतील म्हणजेच घडतंय बिघडतंय या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर ती थांग, सावर रे, एक डाब धोबीपछाड यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आजवर डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई, जोगवा यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. जोगवा या चित्रपटाने तिच्या करियरला एक चांगलेच वळण दिले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण जोगवा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे या चित्रपटाची, या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. आज मराठीतील उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. 
मुक्ता बर्वे आज केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक निर्माती देखील आहे. तिने काही महिन्यांपूर्वी कोड मंत्र या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात ती स्वतः देखील काम करत आहे. तिच्या या नाटकाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या नाटकाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. 
मुक्ताचा आज वाढदिवस असून तिचा वाढदिवस तिच्या कोड मंत्रच्या टीमने खूपच चांगल्याप्रकारे साजरा केला. 
कोड मंत्रच्या टीमने तिच्यासाठी एक भला मोठा केक आणला होता. तसेच तिच्यासाठी अनेक गिफ्टदेखील आणले होते. मुक्ताने तिच्या नाटकाच्या टीमसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

Web Title: Mukta Barve's birthday celebrated by the Mantra team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.