बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:59 PM2024-05-06T12:59:49+5:302024-05-06T13:02:50+5:30

'नाच गं घुमा' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ५ दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

mukta barve namrata sambherao nach ga ghuma movie box office collection day 5 | बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

बॉक्स ऑफिसही म्हणतंय 'नाच गं घुमा'! सिनेमाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. घरोघरी काम करणाऱ्या कामवाली बाईची गोष्ट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. ट्रेलरपासूनच या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'नाच गं घुमा' प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 

मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेल्या 'नाच गं घुमा' सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होताना दिसत आहेत. या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 'नाच गं घुमा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून आलं होतं. 

'नाच गं घुमा' सिनेमाने दुसऱ्या दिवशी ८० लाख तर तिसऱ्या दिवशी ९५ लाखांचा बिजनेस केला होता. पण, शनिवारी आणि रविवारी मात्र सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसून आलं. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, पहिल्या वीकेंडला 'नाच गं घुमा' सिनेमाने ३.९० कोटींची कमाई केली आहे. तर पहिल्या पाच दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७.८० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'नाच गं घुमा' सिनेमाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव,सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकुळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. तर स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी 'नाच गं घुमा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली आहे. 

Web Title: mukta barve namrata sambherao nach ga ghuma movie box office collection day 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.