मुक्ता बर्वेने सांगितले हसण्याचे महत्त्व, म्हणते- '..पण प्रत्येकानं आयुष्यात नक्की हसावं'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 11:36 IST2021-02-06T11:36:26+5:302021-02-06T11:36:48+5:30
मुक्ता बर्वे सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. मात्र बऱ्याचदा ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

मुक्ता बर्वेने सांगितले हसण्याचे महत्त्व, म्हणते- '..पण प्रत्येकानं आयुष्यात नक्की हसावं'
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे.मुक्ता बर्वे सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. मात्र बऱ्याचदा ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. नुकतीच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
मुक्ता बर्वेने तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटले की, तुम्हाला काय वाटतं आपलं हसणं किती महत्त्वाचं असतं ? मला वाटतं आपलं 'असणं' जितकं महत्त्वाचं असतं तेवढंच आपलं हसणं महत्त्वाचं असतं. कधी कधी वाटतं आपण हसतो म्हणून तर आपण 'असतो', मग वाटतं आपण 'असतो' म्हणूनच तर आपण हसतो .कारण कदाचित ज्याचं-त्याचं आपलं-आपल असावं, पण प्रत्येकानं आयुष्यात नक्की हसावं.
मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचेच नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले.
चित्रपटात व्यग्र असतानाही मुक्ताने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. या मालिकेत स्वप्निल जोशी तिच्यासोबत झळकला होता. या मालिकेतील तिची भूमिका, स्वप्निलसोबतचे तिचे ट्युनिंग प्रेक्षकांना खूपच आवडले होते. मुक्ता आणि स्वप्निलच्या जोडीचा मुंबई पुणे मुंबई ३मधील केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. मुक्ता काही दिवसांपूर्वी स्माईल प्लीज सिनेमात दिसली होती.