अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 14:08 IST2024-05-03T14:07:35+5:302024-05-03T14:08:34+5:30

गोल्डन गेट ब्रिजवर मुक्ताने 'नाच गं घुमा'वर डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तिने अमेरिकेतील प्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअरजवळ 'नाच गं घुमा'वर डान्स केला आहे.

mukta barve dance on nach g ghuma in time square video viral | अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स

अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स

मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेल 'नाच गं घुमा' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत होते. प्रदर्शित होण्याआधीच सिनेमातील 'नाच गं घुमा' या गाण्याचा आवाज सर्वत्र घुमला होता. या गाण्यावरील अनेक रील्सही व्हायरल झाल्या होत्या. अनेक सेलिब्रिटींनाही 'नाच गं घुमा' गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. आता मुक्ता बर्वेच्या 'नाच गं घुमा' गाण्यावरील डान्स व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'नाच गं घुमा' सिनेमाच्या टीमकडून जोरदार प्रमोशन सुरू आहे. नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात असलेली मुक्ताही चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. परदेशातही 'नाच गं घुमा'चा आावाज ऐकायला मिळत आहे. गोल्डन गेट ब्रिजवर मुक्ताने नाच गं घुमावर डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तिने अमेरिकेतील प्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअरजवळ नाच गं घुमावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ मुक्ताने शेअर केला आहे. 

या व्हिडिओत मुक्ता 'नाच गं घुमा' गाण्यावर अमेरिकेच्या रस्त्यांवर डान्स करताना दिसत आहे. साडीमध्ये मराठमोळ्या मुक्ताने या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.  मुक्ताचा हा भन्नाट डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मेला सर्वत्र प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: mukta barve dance on nach g ghuma in time square video viral