मृण्मयी देशपांडेने रोमँटिक अंदाजात नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 19:01 IST2022-04-23T19:01:09+5:302022-04-23T19:01:33+5:30
Mrunmayee Deshpande: मृण्मयी देशपांडे बऱ्याचदा नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मृण्मयी देशपांडेने रोमँटिक अंदाजात नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे बऱ्याचदा सेलिब्रेटी सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असतात. कधी कधी त्यांचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसे खास आहे. आज मृण्मयीच्या नवऱ्याचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थ डे राव. आय लव्ह यू. मला तुझी खूप आठवण येते. मृणमयीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर,सुखदा खांडकेकर, अभिजित खांडकेकर, सायली संजीव, आदिनाथ कोठारे अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.
मृण्मयीच्या नवऱ्याचं नाव स्वप्निल राव आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैंकी एक आहे. ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने स्वप्निल रावसोबत लग्नगाठ बांधली. मृण्मयी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि बऱ्याचदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील शेअर करताना दिसते. मृण्मयी पतीसोबतचे रोमाँटिक फोटो ही शेअर करत असते. फोटोंमधून दोघांमधले बॉन्डिंग नेहमी दिसते.
मृण्मयी देशपांडे चंद्रमुखी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दौलत रावांची पत्नी दमंयतीच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. दौलतरावांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे पाहायला मिळणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर पाहायला मिळणार आहे.