नौटंकी बंद कर! हमसून रडली पण डोळ्यांतून पाणीच येईना, गौतमीने शेअर केला मृण्मयीचा मजेशीर व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:52 IST2025-05-29T16:52:17+5:302025-05-29T16:52:51+5:30

अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. मृण्मयीच्या वाढदिवशी गौतमीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

mrunmayee deshpande birthday gautami shared funny video to wish her sister | नौटंकी बंद कर! हमसून रडली पण डोळ्यांतून पाणीच येईना, गौतमीने शेअर केला मृण्मयीचा मजेशीर व्हिडिओ

नौटंकी बंद कर! हमसून रडली पण डोळ्यांतून पाणीच येईना, गौतमीने शेअर केला मृण्मयीचा मजेशीर व्हिडिओ

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या मराठी सिनेसृष्टीतील देशपांडे सिस्टर्स. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवतच गौतमीनेही अभिनयात पदार्पण केलं. देशपांडे सिस्टर्सचा चाहता वर्ग मोठा असून त्या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. एकमेकींसोबतचे मजेशीर व्हिडिओ त्या शेअर करत असतात. मृण्मयीचा असाच एक व्हिडिओ गौतमीने शेअर केला आहे. 

अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. मृण्मयीच्या वाढदिवशी गौतमीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मृण्मयी रडत असल्याचं दिसत आहे. पण, तिच्या डोळ्यातून पाणीच येत नाहीये. त्यानंतर गौतमी तिला विचारते की तुला काय हवंय? यावर मृण्मयी मला मसाज हवाय, असं म्हणते. त्यानंतर रागात येऊन मृण्मयी घरातून निघून जात असल्याचं दिसत आहे. मृण्मयीचा हा व्हिडिओ शेअर करत गौतमीने शुभेच्छा दिल्या आहेत. "Happy birthday Tai! नौटंकी कमी कर आणि कधीतरी माझे पण लाड कर", असं कॅप्शन तिने दिलं आहे.


दरम्यान, मृण्मयीने अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मुंबई सोडून मृण्मयी तिच्या पतीसह महाबळेश्वरला शिफ्ट झाली आहे. तिथे तिने शेतात घर बांधलं आहे. तिथेच पतीसोबत ती स्थायिक झाली असून शेतीदेखील करते. मृण्मयी शेतातील अनेक व्हिडिओही शेअर करताना दिसते.  

Web Title: mrunmayee deshpande birthday gautami shared funny video to wish her sister