मृण्मयी गोडबोलेने परेश रावलला म्हटले 'डियर फादर'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 17:29 IST2017-04-17T08:36:45+5:302017-04-17T17:29:35+5:30
मराठी सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने नुकतंच सोशल मीडियावर अभिनेता परेश रावल सोबत एक छान सेल्फी तिच्या चाहत्यांसाठी शेअर ...

मृण्मयी गोडबोलेने परेश रावलला म्हटले 'डियर फादर'?
म ाठी सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने नुकतंच सोशल मीडियावर अभिनेता परेश रावल सोबत एक छान सेल्फी तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे आणि त्या सेल्फीला तिने डियर फादर असं कॅप्शनही दिलंय. मृण्मयीने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे तिला तिचे चाहते अनेक प्रश्न विचारताना दिसतायेत. तिच्या या एका कॅप्शनमुळे बरेच चाहते मात्र गोंधळले आहेत.व्हायरला झालेला फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवार राहणार नाही.तर या फोटोमागच्या रहस्याचा शोध आम्ही लावला असून त्याचे झाले असे की,मृण्मयी अभिनेता परेश रावल यांच्यासह एका गुजराती नाटकात अभिनय करत आहे. त्या नाटकाचे नाव 'डियर फादर' असे आहे. या नाटकाचे जवळ जवळ ५०० प्रयोग झाले असून या नाटकासाठी मृण्मयीने भारतभर तसंच अमेरिका, लंडन, दुबई, सिंगापुर, नैरोबी या ठिकाणी दौरे केले आहेत. मृण्मयीनेे या नाटकात परेश रावल यांच्या मुलीची भूमिका साकारली असून नाटकातील बाप लेकीच्या भन्नाट केमिस्ट्रीची सध्या देशातच नाहीतर परदेशात कौतुक होत आहे. तिच्या नाटकातील वडिलांसोबतचा एक कूल सेल्फी तिने तिच्या लाडक्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.या फोटोप्रमाणेच बाप लेकीची ऑन स्टेज केमिस्ट्रीही रसिकांच्या काळजाला भिडणारी आहे.
'20म्हणजे 20' सिनेमात रिअल लाइफमध्ये पुण्यात एका एनजीओमध्ये शिकवणारी मृण्मयीने या सिनेमात चक्क 20-20 बालकलाकारांसोबत धम्माल केल्याचे पाहायला मिळाले होते. ‘राजवाडे अँड सन्स’ या सिनेमातही मृण्मयी गोडबोलेच्या भूमिकेचे कौतुक केले गेले होते.आता ती 'डियर फादर' या नाटकाच्या माध्यमातून रसिकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.