मृणाल कुलकर्णीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमधून लेकाचे सीक्रेट केले ओपन, ही अभिनेत्री होणारेय भावी सून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 13:57 IST2022-02-28T13:56:53+5:302022-02-28T13:57:23+5:30
मृणाल कुलकर्णी(Mrinal Kulkarni)च्या पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष, केला मुलाच्या लग्नाबाबत खुलासा

मृणाल कुलकर्णीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमधून लेकाचे सीक्रेट केले ओपन, ही अभिनेत्री होणारेय भावी सून
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात त्यांनी काम केले आहे. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा लेक विराजस कुलकर्णीने देखील मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. मात्र विराजस बऱ्याचदा प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. आज विराजसचा वाढदिवस असून त्याला हटके अंदाजात मृणाल कुलकर्णी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरेतर या पोस्टमधून त्यांनी त्याचे बरेच सीक्रेट ओपन केले आहेत.
मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, अनेक वर्ष आम्ही दोघे तुझ्या या वाढदिवसाची वाट पहात होतो. कारण काहीही ठरवायचे असेल की तू फेब्रुवारी २०२२ नंतर बघू असे उत्तर द्यायचास. बरं झाले, या तारखेआधीच तू काही गोष्टी ठरवल्यास. महत्त्वाचे म्हणजे शिवानी रांगोळेसोबत लग्न करण्याचे ठरवलेस. तर नवं नाटक हातात घेऊन ही गोष्ट तू पूर्ण करत आहेस. तुझा नवीन सिनेमाही लवकरच येतोय. या वाढदिवसापासून नव्या गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहेत. त्यामुळे तुझं आयुष्य सुंदर बनेलच. लग्न होईल. जबाबदारी वाढेल.
त्यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, आई बाबा म्हणून आम्हाला खात्री आहे की नव्या पर्वात तू नेहमीच्या आत्मविश्वासाने आणि तळमळीने काम करशील. मेहनती आणि समजूतदार तर तू आहेसच. छान रहा, काळजी घे. आयुष्यातील महत्त्वपूर्ण वर्षासाठी तुला खूप शुभेच्छा.
त्याला शुभेच्छा देत पोस्टच्या शेवटी ताजा कलममध्ये मृणाल यांनी त्याची खोली आवरून ठेवल्याचा निरोपही त्याच्यासाठी लिहिला आहे.