दोन पात्रांची कहाणी सांगणारा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 17:02 IST2016-09-16T11:32:16+5:302016-09-16T17:02:16+5:30

              चित्रपटात कलाकार कोण आहे यावरूनच चित्रपट पाहायचा कि नाही हे प्रेक्षक ठरवतात. ...

Movie about two characters | दोन पात्रांची कहाणी सांगणारा चित्रपट

दोन पात्रांची कहाणी सांगणारा चित्रपट

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
            चित्रपटात कलाकार कोण आहे यावरूनच चित्रपट पाहायचा कि नाही हे प्रेक्षक ठरवतात. त्यामुळेच की काय, बॉलिवूडमध्ये सुपरहिट कलाकारांचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर विक्रमी कमाई करतात. बºयाचदा आपल्याला हिंदी चित्रपटांमध्ये कलाकारांची झुंबड पाहायला मिळते. काही दिग्दर्शकांचे चित्रपट तर असे असतात की ज्यामध्ये आपल्याला तीन चे चार हिरो आणि हिरोईन्स दिसतातच. आणि असे चित्रपट पाहायलाही प्रेक्षक गर्दी करतात. सिनेमावाल्यांची ही बिझनेस करण्याची कल्पना जरी भारी असली तरी प्रेक्षकांना सुद्धा मल्टीस्टारर चित्रपट पाहायला आवडतात. मराठीतही अनेक कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट बनविण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. पण असे असतानाही मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटात केवळ दोनच कलाकार आहेत. स्मिता गोंदकर आणि राजेंद्र शिसतकर या दोघांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. कलाकार जरी दोनच असले तरी दमदार कथानक असल्याने हा चित्रपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास या चित्रपटाच्या टिमने व्यक्त केला आहे. चार भिंतींच्या आतील नवरा बायकोची गोष्ट या चित्रपटात हळूवारपणे उलगडण्यात आली आहे. मराठी चित्रपट हा आशयप्रधान असल्याने कथा जर उत्तम असेल तर चित्रपट दोन कलाकार देखील सुपरहिट करू शकतात एवढे मात्र खरे. 

Web Title: Movie about two characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.