मोनालिसा बागल का म्हणते, '18 ओन्ली कायदयाचा घो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 11:17 IST2017-02-13T05:47:24+5:302017-02-13T11:17:24+5:30
झाला बोभाटा या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मोनालिसा बागल हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता ही अभिनेत्री लवकरच एका ...
.jpg)
मोनालिसा बागल का म्हणते, '18 ओन्ली कायदयाचा घो'
झाला बोभाटा या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मोनालिसा बागल हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता ही अभिनेत्री लवकरच एका आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री स्मिता गोंदकरदेखील झळकणार आहे. 18 ओन्ली कायदयाचा घो असे या चित्रपटाचे नाव आहे. तिच्या या चित्रपटाविषयी मोनालिसा बागल सांगते, या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत असणार आहे. खूपच सुंदर असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी एक साधी सरळ ग्रामीण भागातील मुलगी दाखविण्यात आली आहे. मात्र शिक्षणामुळे ती शहरात येते. शहरात आल्यावर तिच्यामध्ये खूपच बदल दाखविण्यात आला आहे. हा बदल होता, तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो. मात्र टीम एजर असल्यामुळे या दोघांना लग्न करता येत नाही. तिच्या आयुष्यात येणाºया मुलाला १८ कप्लींट असतात. पण कायदयाप्रमाणे २१ पाहिजे असतात. अशावेळी एक विचार निर्माण होतो की, १८ पूर्ण असल्यामुळे तुम्ही मतदान करू शकता, देशाचा पंतप्रधान निवडून देऊ शकतात मग स्वत:साठी जोडीदार का नाही. अशा कथेवर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे. तसेच अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्यासोबत काम करताना खूप छान अनुभव मिळाला. तसेच या चित्रपटातील दिग्दर्शक, कलाकार सर्वाकडून खूप काही शिकण्यास मिळाले असल्याचेदेखील तिने यावेळी सांगितले.
मोनालिसा बागलचा काही दिवसांपूर्वीच झाला बोभाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती अभिनेता मयूरेश पेमसोबत पाहायला मिळाली. या दोघांवर आधारित असणारे या चित्रपटातील पैजण हे गाणं खूपच हीट झालं आहे. या चित्रपटात या दोघांसोबत दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत आदि कलाकार पाहायला मिळाले. आता तिचा १८ ओन्ली कायदयाचा घो हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशा विश्वासदेखील मोनालिसाने व्यक्त केला आहे.