आदर्श शिंदे याचं पहिलं रॉक गाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 14:19 IST2016-09-16T08:45:52+5:302016-09-16T14:19:19+5:30
व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन्स निर्मित फोटोकॉपी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील मोरा पिया या रॉक गाण्याची सध्या चलती आहे. हे पहिले रॉक गाणं मराठी रसिकांचा लाडका गायक आदर्श शिंदे यांनी गायलं आहे
.jpg)
आदर्श शिंदे याचं पहिलं रॉक गाणं
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन्स निर्मित फोटोकॉपी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील मोरा पिया या रॉक गाण्याची सध्या चलती आहे. हे पहिले रॉक गाणं मराठी रसिकांचा लाडका गायक आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. तसेच हे गाणे मंदार चोळकर यांनी लिहीले असून प्रफुल कार्लेकर यांनी संगीत दिले आहे. या गाण्याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना आदर्श सांगतो, या गाण्याचा इतिहासच निराळा आहे. खरं तर संगीतकार प्रफुल यांनी हे गाणे यु टयूबवर प्रदर्शित केले होते. यानंतर मी हे गाणे सोशलमीडियावर शेअर केले. हे गाणे गायक नेहा राजपाल यांना फार आवडले. त्यांचा लगेच फोन आला की, हे गाणे माझ्या प्रॉडक्शनसाठी पाहिजे आहे. कारण त्यांच्या फोटोकॉपी या चित्रपटातील एका सीनसाठी हे गाणे परफेक्ट जात होते. तसेच हे रॉक गाणं गाण्याचा माझा अनुभव एकदम अप्रतिम होता. या गाण्यात माझी एक हटके स्टाइलदेखील दिसत आहे. त्यामुळे हे गाणं गाताना खूप मजा आली.