क्वारांटाईन झालेल्या या मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो, आतापर्यंत मिळाले 2 लाखाहुन अधिक लाईक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:54 IST2020-04-03T17:28:00+5:302020-04-03T17:54:23+5:30
या अधिक तिच्या नो मेकअप लूकला देखील चाहत्यांची पसंती मिळाली होती.

क्वारांटाईन झालेल्या या मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो, आतापर्यंत मिळाले 2 लाखाहुन अधिक लाईक्स
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील १८० पेक्षा जास्त देशांना विळख्यात घेतला आहे. लॉकडाऊन नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे. घरातलॉकडाऊन झालेले कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्रींचा नो- मेकअप लूकमधील फोटो अनेकांना सोशल मीडियावर पाहिला मिळाला. तर काहीजण जेवण करताना दिसले.
अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पूर्णपणे स्वत:ला कव्हर केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत फक्त मिथिलाचे डोळे दिसतायेत. फोटोत मिथिलाने जॅकेट घालून नाकाभवती स्कार्फ गुंडाळलेला आहे. मिथिलाच्या या फोटोवर आतापर्यंत 2 लाख 26 हजारहुन अधिक लाईक्स आले आहेत.
मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.
तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'माझा हनीमून'मध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.