प्रसादसोबत असलेली ही चिमुरडी बनलीय अभिनेत्री, करणार आहे एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 17:18 IST2019-09-30T17:09:24+5:302019-09-30T17:18:20+5:30
हिरकणी या चित्रपटाच्या निमित्ताने एका अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा प्रसादसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

प्रसादसोबत असलेली ही चिमुरडी बनलीय अभिनेत्री, करणार आहे एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न
प्रसाद ओकच्या हिरकणी या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा प्रसादसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ही अभिनेत्री अतिशय गोड दिसत असून हा तिचा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोसोबत ती प्रसाद ओकला पहिल्यांदा केव्हा भेटली, या आठवणीला देखील उजाळा दिला आहे.
मिताली मयेकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. प्रसादच्या हिरकणी या चित्रपटाला शुभेच्छा देताना मिताली मयेकरने तिचा लहानपणीचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी लहान असताना घरकूल ही मालिका न चुकता पाहात होते. या मालिकेची मी मोठी फॅन होती. या मालिकेत काम करणारा एक अभिनेता मला प्रचंड आवडायचा. हाच तो अभिनेता आहे, ज्याच्यासोबत माझा हा फोटो आहे.
कोणत्याही सेलिब्रेटीसोबत फोटो काढण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. मी कशी तरी हिंमत करून त्या अभिनेत्याच्या जवळ गेले होते आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची त्याला विनंती केली होती. मी त्यावेळी विचार देखील केला नव्हता की दोन दशकानंतर या अभिनेत्यासोबत माझी चांगली मैत्री होईल आणि त्याच्यासोबत मी मस्त फिरेन... आज मी त्याची मैत्रीण असली तरी मी आजही पहिली त्याची फॅन आहे. मी चार वर्षांची असताना त्याच्याकडे कशी पाहायची, तशीच आजही त्याच्याकडे पाहाते. प्रसाद दादा शिवराज्यभिषेक गाण्यासाठी खूप सारे धन्यवाद... तुझा हिरकणी हा चित्रपट कधी येतोय याची मी आतुरतेने वाट पाहातेय... तुला आणि मंजिरी ओकला खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा...