जागितक पर्यावरण दिनानिमित्त आशुने दिला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 12:51 IST2016-06-05T07:21:27+5:302016-06-05T12:51:27+5:30
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा सर्वाचा लाडका आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर यांने जागितक पर्यावरण दिना निमित्त झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश आपल्या हटक्या अंदाजात दिला आहे.

जागितक पर्यावरण दिनानिमित्त आशुने दिला संदेश
द ल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा सर्वाचा लाडका आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर यांने जागितक पर्यावरण दिना निमित्त झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश आपल्या हटक्या अंदाजात दिला आहे. यासाठी त्याने एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने प्रेक्षकांना भावनिक रीत्या भावेल असा सुंदर संदेश एकपात्री नाटकातून दिला आहे. तसेच आपल्या गंमतीशीर अंदाजात सैराटच्या फेव्हर पाहता, झाडं लावलं...झाडं लावलं.... असे गाणे देखील गायले आहे. आशु म्हणतो, तुम्ही तुमच्या आवडत्या सेलेब्रिटींवर जसे भरभरून प्रेम करता तसेच निसर्गावर देखील केलं पाहिजे. त्याचप्रमाणे झाडे लावण्यासाठी कोणावर ही अवलंबून न राहता, स्वत: पुढाकार घ्या. असा संदेश त्याने आशु स्टाइलमध्येच प्रेक्षकांपर्यत पोहोचविला आहे.