छंद प्रितीचा ने जागवल्या लावणी सम्राज्ञींच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 09:34 IST2017-11-09T04:04:10+5:302017-11-09T09:34:10+5:30

गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त लोकनाट्याचा आविष्कार म्हणजे 'तमाशा'... या तमाशात रंगणाऱ्या श्रृंगारिक लावण्यांनी एक काळ गाजवला. पुढे विनोदी चित्रपटांचा काळ ...

The memories of the lavani empress who are awakened by the hobby Priti | छंद प्रितीचा ने जागवल्या लावणी सम्राज्ञींच्या आठवणी

छंद प्रितीचा ने जागवल्या लावणी सम्राज्ञींच्या आठवणी

यन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त लोकनाट्याचा आविष्कार म्हणजे 'तमाशा'... या तमाशात रंगणाऱ्या श्रृंगारिक लावण्यांनी एक काळ गाजवला. पुढे विनोदी चित्रपटांचा काळ आला आणि लावणीतला रस मागे पडला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांनी या लावण्यांची मजा लुटली. महाराष्ट्राच्या लोकसंगीताला नवलाईचा तडका लागला आणि लावणी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत डोकावली. आता मात्र जुनं ते सोनं म्हणत लावणीचा तोच बाज प्रेक्षकांसमोर आणला आहे प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ या चित्रपटाने... या सिनेमात शाहीर सत्यवानाच्या लेखणीतून अवतरलेली श्रृंगारिक लावणी, शाहीरी लावणी, सवाल - जवाब यासारख्या गीतांवर नृत्यांगना चंद्राच्या लावणीचं दिलखेचक सादरीकरण प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी होत आहे. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील लावण्यांनी लावणीसम्राज्ञींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 
शोभा शिराळकर -  छंद प्रितीचा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यापासूनच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती... खूप छान वाटलं. एकदम 'पिंजरा' चित्रपटाची आठवण झाली. एन. रेळेकरांच्या सुंदर दिग्दर्शनाला सुवर्णा च्या लावण्यांनी रंगत आणली आहे. अर्थात सुबोध भावेंना ढोलकीसम्राटाच्या भूमिकेत पाहण्यात वेगळी मजा आहे. बऱ्याच वर्षांनी असा एखादा लावणीप्रधान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याने रसिकमनं प्रफुल्लित झाली आहेत.
 
उषा नाईक -  "छंद प्रितीचा च्या निमित्ताने लोकसंगीतावर आधारित एक चित्रपट बऱ्याच वर्षांनी आला याचा आनंद आहे. चित्रपटसृष्टीत आलेला लावणीप्रधान चित्रपटांचा तो काळ खूप वेगळा होता. हल्ली मराठीत वेगळे विषय हाताळले जातात... कुठेतरी लावणी मागे पडत होती पण आता पुन्हा एकदा छंद प्रितीचाच्यानिमित्ताने ती प्रकाशझोतात येते आहे. आज लावणीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. कित्येक शिकलेले पालक आपल्या पाल्याला लावणी शिकण्यास प्रोत्साहन देत आहेत, ही खरंच कौतुकाची बाब आहे. आमच्यावेळी लावणीप्रधान चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं, या चित्रपटांच्या पदरी पडलेलं यश छंद प्रितीचा चित्रपट अनुभवेल, यात शंका नाही".
 
मेघा घाडगे -  आजच्या काळात लोकसंगीतावर चित्रपट येणं आवश्यक होतं... सिनेसृष्टीत कित्येक लावणीसम्राज्ञीं होऊन गेल्या... त्यांनी एक काळ गाजवला मात्र हल्ली लावणीचे शोज् जरी होत असले तरी चित्रपटात त्याचा वापर कमी झाला आहे. तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छंद प्रितीचा चित्रपटाच्या निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे खूप आभार. सुवर्णासारख्या लोकसंगीताशी निगडीत कलाकाराला घेऊन या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल निर्मात्यांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. त्यात सुबोध भावेसारख्या चतुरस्त्र अभिनेत्याचा अभिनय...म्हणजे सोने पे सुहागा...
 

रसिकमनांवर लावणीची जादू पुन्हा करणाऱ्या छंद प्रितीचा छंद प्रितीचा चित्रपट जरूर पहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...

Web Title: The memories of the lavani empress who are awakened by the hobby Priti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.