दिग्दर्शक केदार शिंदेच्या सिनेमात मयुरेश पेम रावडी भूमिकेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 14:00 IST2017-03-09T06:03:44+5:302017-03-10T14:00:09+5:30
अभिनेता मयुरेश पेम एका सिनेमात रावडी लुक असलेल्या भूमिकेत झळकणार आहे.विशेष म्हणजे हा सिनेमा दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी ...

दिग्दर्शक केदार शिंदेच्या सिनेमात मयुरेश पेम रावडी भूमिकेत.
अ िनेता मयुरेश पेम एका सिनेमात रावडी लुक असलेल्या भूमिकेत झळकणार आहे.विशेष म्हणजे हा सिनेमा दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी सिनेमा असणार आहे. हा सिनेमा रोमँटीक लव्हस्टोरीवर आधारित असून या सिनेमाचे नाव गुलदस्त्याच ठेवण्यात आले आहे.लवकरच केदार शिंदे यांच्या या सिनेमाची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे.सिनेमात मयुरेश पेम साकारणारे हे कॅरेक्टर प्रेमात पडण्याआधी तो एरियातला दादा असतो.त्याला सगळेजण दादा या नावाने ओळखत असतात.त्याला प्रेम आणि इतर गोष्टींचे काहीही घेणंदेणं नसते. पण शेवटी प्रेम हे प्रेम असते यानुसार हा दादाही एका मुलीच्या प्रेमात पडतो.त्यानंतर त्याच्या आयुष्यात येणारे बदल,एरव्ही एरियातला दादा असणारा रावडी मुलगा प्रेमात पडल्यानंतर सभ्य प्रेमी बनतो.प्रेमात पडल्यानंतर या मुलाच्या आयुष्यात येणा-या वळणावर आधारित सिनेमा असल्याचे कळतंय.विशेष म्हणजे केदार शिंदे सिनेमाचे दिग्दर्शन करणार म्हटल्यावर हा सिनेमा त्यांच्या इतर सिनेमांप्रमाणे नक्कीच धमाकेदार असणार त्यामुळे आतापासूनच या सिनेमाविषयी खूप अपेक्षा आहेत. या सिनेमासह मयुरेश महेश मांजरेकर यांचा'एफयु' सिनेमा,ऋषिकेश गुप्ते यांचा 'दिल दिमाग और बत्ती' तसेच जेम्स एरिक्सन दिग्दर्शित 'सचिन'या हॉलिवूड सिनेमात नितीन तेंडुलकर यांच्या भूमिकेत तो झळकणार आहे.जानेवारी महिन्यात झळकलेला मराठी सिनेमा 'झाला बोभाटा' मध्येही मयुरेश पेम झळकला होता.या सिनेमातील त्याच्या भूमिकेचेही विशेष कौतुक करण्यात आले होते.त्यामुळे त्याच्या येणार-या नवीन सिनेमासाठीही तो विशेष मेहनत घेत आहे.