मयूरेश पेम करणार हिंदी नाटक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 16:02 IST2017-01-14T16:02:14+5:302017-01-14T16:02:14+5:30

 प्रेक्षकांचा लाडका अभिनेता मयूरेश पेम हा लवकरच हिंदी नाटक करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. मात्र या नाटकाचे ...

Mayures Paim to Hindi drama? | मयूरेश पेम करणार हिंदी नाटक ?

मयूरेश पेम करणार हिंदी नाटक ?

 
्रेक्षकांचा लाडका अभिनेता मयूरेश पेम हा लवकरच हिंदी नाटक करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. मात्र या नाटकाचे नाव काय असणार आहे हे अदयापदेखील कळाले नाही. त्याचबरोबर या नाटकात त्याच्यासोबत कोण असणार आहे हेदेखील गुलदस्त्यात आहे. मयूरेशने यापूर्वी अनेक मराठी नाटक केले आहे. तो सध्या आॅल दि बेस्ट २ या नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक रंगभूमीवर दाखविताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच नुकताच त्याचा झाला बोभाटा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटात मयूरेशसोबत अभिनेत्री मोनालिसा बागल झळकली आहे. या दोघांची प्रेमकथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच झाला बोभाटा या चित्रपटातीला या दोघांवर चित्रित करण्यात आलेले पैंजण हे गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तसेच या चित्रपटात त्याच्यासोबत दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, कमलेश सावंत, संग्राम साळवी, संजय खापरे असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. आता तो महेश मांजरेकर दिग्दर्शित एफयू या आगामी चित्रपटादेखील झळकणार आहे. या चित्रपटात मयूरेशसोबत सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, मधुरा देशपांडे, संस्कृती बालगुडे अशा अनेक तरूण कलाकारांचा समावेश आहे.  मराठी नाटक आणि चित्रपटानंतर आता हा नवोदित अभिनेता हिंदी रंगभूमीकडे वळला आहे. त्याचे हे हिंदी नाटक प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. चला तर प्रेक्षकांना मयूरेश अभिनय हिंदीमध्ये पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

         








Web Title: Mayures Paim to Hindi drama?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.