"मारुती कुणी वेगळा नाही, तो...", सिद्धार्थ जाधवनं सांगितलं 'आता थांबायचं नाय'मधील भूमिकेबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:12 IST2025-04-25T18:12:13+5:302025-04-25T18:12:56+5:30

Aata Thambayacha Nai Movie : 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

"Maruti is no different, he...", Siddharth Jadhav said about his role in 'Aata Thambayacha Nai' | "मारुती कुणी वेगळा नाही, तो...", सिद्धार्थ जाधवनं सांगितलं 'आता थांबायचं नाय'मधील भूमिकेबद्दल

"मारुती कुणी वेगळा नाही, तो...", सिद्धार्थ जाधवनं सांगितलं 'आता थांबायचं नाय'मधील भूमिकेबद्दल

सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट (Aata Thambayacha Nai Movie) येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. शिवराज वायचळ याने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मारुतीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच त्याने त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले. 

सिद्धार्थ जाधव म्हणतो, “ एक कलाकार म्हणून समृद्ध करणारी, माणुसकी शिकवणारी ही भूमिका आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील खऱ्याखुऱ्या सुपरहिरोंची ही गोष्ट आहे आणि त्यापैकी एकाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कलाकार म्हणून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत परंतु 'मारुती कदम' हे पात्र नेहमीच माझ्या जवळचे राहील. मारुती कोणी वेगळा नाही, तो आपल्यातलाच एक आहे. अशा सुपरहिरोचे आयुष्य यानिमित्ताने जवळून अनुभवता आले, यासाठी शिवराज वायचळ यांचे मनापासून आभार.'' 


 या चित्रपटात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे.  चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव प्रोड्यूसर आहेत. येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Web Title: "Maruti is no different, he...", Siddharth Jadhav said about his role in 'Aata Thambayacha Nai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.