​नववधू सावनी रविंद्रने पतीला दिले हे सरप्राइज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 15:00 IST2018-05-08T09:30:55+5:302018-05-08T15:00:55+5:30

गायिका सावनी रविंद्रचे नुकतेच लग्न झाले. सावनीच्या लग्नानंतर तिचे पहिले रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे सावनीने आपल्या ...

Married wife Savni gave surprise to husband! | ​नववधू सावनी रविंद्रने पतीला दिले हे सरप्राइज!

​नववधू सावनी रविंद्रने पतीला दिले हे सरप्राइज!

यिका सावनी रविंद्रचे नुकतेच लग्न झाले. सावनीच्या लग्नानंतर तिचे पहिले रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेले सरप्राइज गिफ्ट आहे. या आगळ्या सरप्राइज गिफ्ट विषयी नववधू सावनी सांगते, ”मला आशिषला वेडिंग गिफ्ट देण्याची इच्छा होती. काय गिफ्ट द्यावे याचा विचार करताना माझ्या असे लक्षात आले की, माझे सूर हेच माझे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मी त्याला एक सुरेल सरप्राइज द्यायचे ठरवले. जुनी गाणी गाण्यापेक्षा त्याच्यासाठीच एक गाणे तयार करायचे मी नक्की केले आणि मग माझ्या भावाला वैभव जोशी आणि मित्र सागर धोते, मयुर धांधेला यात सहभागी केले. वैभव जोशीने लिहिलेल्या गीताला सागर धोतेने संगीतबद्ध केलंय तर मयुरने गाण्यात माझ्या पतीचे आशिषचे पेटिंग बनवलंय. मी आमच्या लग्नाच्या ‘संगीत’च्या कार्यक्रमाला हे सरप्राइज आशिषला दिले. माझ्या या रोमँटिक सरप्राइजनंतर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते आणि आता मी तेच माहिया गाणे ऑफिशिअली लाँच केलंय. जसं आशिषला गाणं आवडलं तसंच ते सर्व कानसेनांनाही आवडेल, असा मला विश्वास वाटतो.” 
गायिका सावनी रविंद्रचे नुकतेच पुण्यात लग्न झाले. पुण्यातील शुभारंभ लाँन्स येथे सावनी ठरावीक मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकली. सावनीच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील देखील तिचे जवळचे अनेक मित्रमैत्रीण उपस्थित होते. सावनीच्या मित्रमैत्रिणींनी सावनीच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. एवढेच नव्हे तर सावनीने देखील फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या प्रोफाईलमध्ये तिचे लग्न आशिष डांगेसोबत झाले असल्याचे लिहिले होते. आशिष पेशाने डॉक्टर आहे. आशिष हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे. आशिष आणि सावनीचा मार्च महिन्यात साखरपुडा झाला होता. सावनीने लग्नात नऊवारी घातली होती तर रिसेप्शनला ती घेरदार वन पीसमध्ये दिसली. तिच्या या दोन्ही लूकमधील फोटो तिच्या मित्रमैत्रिणींनी फेसबुकला शेअर केले होते. या तिच्या फोटोंवर तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या. 
सावनी रविंद्रच्या घरी संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे येणं-जाणं कायम असायचे. त्यातलं एक मोठ्ठं नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी. त्यांच्याकडे बघून, ऐकून सावनी तयार झाले. वयाच्या १४व्या वर्षापासून ती त्यांच्यासोबत गाणी गावू लागले. हृदयनाथजी यांच्यासोबत ती अनेक वर्षं प्रोफेशनली गात होती आणि २०११ मधील ‘झी सारेगमप’ मध्ये सहभागी झाले. आणि त्या सीजनची ती फायनलिस्ट ठरली होती. होणार सून मी या घरची या मालिकेच्या शीर्षकगीतामुळे ती नावारूपाला आली. 

Also Read : लता मंगेशकर आणि अाशा भोसले यांच्या गाण्यावर आधारित सावनी रवींद्र सादर करणार लताशा
   

Web Title: Married wife Savni gave surprise to husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.