नीरजा चित्रपटात गाणार मराठमोळी गायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:31 IST2016-02-04T06:01:35+5:302016-02-04T11:31:35+5:30
सध्या मराठी इडस्ट्री खूप उंचावर पोहोचलेली दिसते. कारण मराठी चित्रपटातील कलाकार ज्याप्रमाणे बॉलिवुड, हॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत. ...

नीरजा चित्रपटात गाणार मराठमोळी गायक
सध्या मराठी इडस्ट्री खूप उंचावर पोहोचलेली दिसते. कारण मराठी चित्रपटातील कलाकार ज्याप्रमाणे
बॉलिवुड, हॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत. तर पदडयामागचे कलाकार तरी कसे मागे राहतील. विचारात
पडलात ना,तर ऐका माहितच असेल की, सोनम कपूरच्या नीरजा या बॉलिवुडची चर्चा सगळीकडेच आहे. या
चित्रपटात तिने नीरजा भनोटची भूमिका साकारली आहे.
नीरजा भनोट या तरूणीने १९८६ साली आतंकवादीनी हायजॅक केलेल्या अमेरिकी पॅम एम ७६ फ्लाइट अटेडंट या विमानातील ३५९ प्रवासांचे प्राण वाचविले होते.
याच तरूणीचे साहस व इतरांनी देखील यातून प्रेरणा घ्यावी यासाठी मराठमोळी गायकांनी ती गाण्याच्याभावनेतून व्यक्त केली आहे.
या चित्रपटात गायक अरूण इंगोले व मंदार आपटे यांचं जीते है गाणं ऐकण्यास
मिळेल तर याव्यतिरिक्त गायक अर्चना गोरे, प्रगती जोशी, मयुरी पटवर्धन या मराठी मोळी गायकांचा सुरेख
आवाज देखील बॉलिवुडमध्ये घुमेल. असो, चला तर मग मराठी कलाकारासोबत मराठीमोळी गायक देखील
उंचावर पोहोचत आहे. त्यांच्या या वाटचालीस शुभेच्छा देउयात.