मराठमोळी भाग्यश्री लवकरच झळकणार बॉलिवूडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:00 IST2018-11-27T21:00:00+5:302018-11-27T21:00:00+5:30
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

मराठमोळी भाग्यश्री लवकरच झळकणार बॉलिवूडमध्ये
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा माझ्या बायकोचा प्रियकर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
ट्रायअँगल प्रोडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार असून, हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल व इतर कलाकारांबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तिचे चाहते त्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. बॉलिवूडमध्ये नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचादेखील लवकरच समावेश होणार आहे.
आगामी वर्षाप्रमाणे यंदाचे वर्षदेखील तिच्यासाठी खूप खास आहे. कारण, यावर्षी सलग तीन मराठी चित्रपटांद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्यापैकी 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियकर' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आणि लवकरच तिचा 'विठ्ठल' हा सिनेमादेखील या वर्षाअखेरीस प्रदर्शित होत आहे. यात तिची एक विशिष्ट भूमिका आहे.
गोंडस आणि गोजिऱ्या चेहऱ्याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. त्यामुळे आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली असून, मराठमोळ्या भाग्यश्रीची बॉलिवूड एन्ट्री पाहण्यासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !