मराठमोळी ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:45 IST2022-04-19T16:45:15+5:302022-04-19T16:45:44+5:30
या अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

मराठमोळी ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, जाणून घ्या याबद्दल
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. बऱ्याचदा सोनाली सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. सोनालीने मागच्या वर्षी ७ मे रोजी फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नबंधनात अडकली. आता असं समजतंय की ती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे.
सोनाली कुलकर्णी मागच्या वर्षी तिच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना फोटो शेअर करत लग्नाची आनंदाची वार्ता सांगितली होती. ७ मे, २०२१ रोजी सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत मंदिरात लग्न केले होते. त्यावेळी कुणाल आणि सोनाली यांच्या घरचे नातेवाईक ऑनलाइन लग्नाला हजर राहिले होते. त्यामुळे आता सोनाली पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते. होय आपण ऐकले ते खरे आहे. आता सोनाली कुलकर्णी ही पती कुणाल याच्यासोबतच पुन्हा लग्न करणार आहे. कारण कोरोना काळामध्ये कोणीही त्यांच्या लग्नाला येऊ शकले नाही. त्यामुळे आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. याबाबत सोनालीने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. आता लग्नाची तयारी देखील धामधुमीत सुरू करण्यात आली आहे. पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळींना या लग्नासाठी बोलावण्यात येणार आहे,असे देखील सोनाली हिने सांगितले.
सोनाली म्हणाली, कुणाल सोबत लग्न करणार आहे. मराठमोळ्या पद्धतीने माझा हा लग्नसोहळा पार पडेल. आम्ही दोघेही महाराष्ट्रीयन आहोत. आमच्या दोघांचे संस्कार संस्कृती आणि परंपरा सारखेच आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मराठमोळ्या पद्धतीने लग्न करू.