लग्नानंतर प्रथमेश-मुग्धाच्या आयुष्यात आला आनंदाचा क्षण; म्हणाला, 'श्रीदत्त महाराजांच्या कृपेने.. '

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:27 AM2024-02-16T10:27:29+5:302024-02-16T10:28:45+5:30

Prathamesh laghate: प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

marathi singer prathamesh-laghate-shares-this-happiness-happened-moment-of-for-the-first-time-after-marriage | लग्नानंतर प्रथमेश-मुग्धाच्या आयुष्यात आला आनंदाचा क्षण; म्हणाला, 'श्रीदत्त महाराजांच्या कृपेने.. '

लग्नानंतर प्रथमेश-मुग्धाच्या आयुष्यात आला आनंदाचा क्षण; म्हणाला, 'श्रीदत्त महाराजांच्या कृपेने.. '

मराठी संगीतविश्वातली गाजलेली जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate )आणि मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan). अलिकडेच या जोडीने अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सध्या त्यांचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. सोबतच ते त्यांचं करिअर सुद्धा उत्तमरित्या सांभाळत आहेत. यामध्येच प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आल्याचं म्हटलं आहे. सोबतच त्याने काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. त्याची ही पोस्ट सध्या सगळीकडे चर्चेत येत आहे.

प्रथमेशने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक जण त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. प्रथमेश आणि मुग्धाने नृरसिंहवाडी येथे जाऊन जोडीने श्री दत्तात्रयाचं दर्शन घेतलं. त्यामुळे हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याचं त्याने म्हटलं आहे.

काय आहे प्रथमेशची पोस्ट?

आजि आनंद आनंद | मनी भरला पूर्णानंद |
वाचे बोलता तो न ये | बुद्धिबोध बोध स्तब्ध राहे ॥
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पदसंग्रहातील या ओळींची प्रत्यक्ष अनुभूती मागच्या आठवड्यात आली. सांगलीला चितळे बंधू यांच्या सुरश्री संगीत महोत्सवात माझं आणि मुग्धाचं गाणं होतं. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या प्रचंड लाडक्या श्रद्धास्थानापैकी एक श्री नृसिंहवाडी येथे श्रीदत्त महाराजांच्या कृपेने लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला. नेहमीप्रमाणेच दक्षिणद्वाराशी गायनसेवाही झाली. अतिशय प्रसन्न वातावरणात अप्रतिम दर्शन घडलं. दक्षिणद्वाराशी गायनसेवा झाल्यावर डोळे उघडताच समोर श्री संकेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं दर्शन झालं. हा दुग्ध शर्करा योगच!! त्याच दिवशी संध्याकाळी आयुष्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन दर्शनाचा आणि तिथेही महाराजांसमोर बसून गायनसेवेचा योग आला. महाराजांना गायनसेवा अतिप्रिय आहे आणि महाराज ही सेवा नेहमी आमच्याकडून करुन घेतात हे आमचं परमभाग्य आहे. एकाच दिवशी श्री मनोहर पादुका आणि श्री विमल पादुकांच्या दर्शनाचा लाभ होणं व दोन्ही स्थानी महाराजांजवळ बसून गायनसेवा करायला मिळणं हे श्री महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही. याच प्रसंगीचे काही फोटो आपल्याशी शेयर करतोय, " असं म्हणत प्रथमेशने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून  लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहे. तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे जेथे ती प्रथमेशसोबतच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.

Web Title: marathi singer prathamesh-laghate-shares-this-happiness-happened-moment-of-for-the-first-time-after-marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.