"तर कदाचित मी डोळे मिटले असते…" भर कार्यक्रमात नंदेश उमप यांना आलेला हृदयविकाराचा झटका, म्हणाले-"माझ्या नशिबाने…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:56 IST2025-11-23T13:52:06+5:302025-11-23T13:56:48+5:30
कार्यक्रमादरम्यान गायक नंदेश उमप यांना आलेला हॉर्ट अटॅक, 'त्या'कठीण काळाबद्दल बोलताना झाले भावुक

"तर कदाचित मी डोळे मिटले असते…" भर कार्यक्रमात नंदेश उमप यांना आलेला हृदयविकाराचा झटका, म्हणाले-"माझ्या नशिबाने…"
Nandesh Umap: हल्लीच्या पॉप आणि रॉकच्या जमान्यात लोकसंगीताकडे आजची पिढी पाठ फिरवत असल्याचं दिसून येतं. लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेची ओळख गायक नंदेश उमप यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकसंगीताचा वारसा जपला आहे. नंदेश उमप हे सुप्रसिद्ध गायक असून ते शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत. नंदेश उमप यांनी अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. शिवाय त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमधील गाण्यांना देखील आपला आवाज दिला आहे. सध्या नंदेश उमप एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी आपल्या आय़ुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.
नंदेश उमप यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. एक वेळ अशी आलेली की, नंदेश उमप यांना कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचे तीन झटके आलेले. या मुलाखतीदरम्यान नंदेश उमप म्हणाले,"मला माहित नव्हतं अचानक या गोष्टी घडल्या. त्यामुळे लोकांना मी सांगेन की तुम्ही दर सहा महिन्यांनी बॉडी चेकअप करा. तर तेव्हा माझ्या शरिरातील तीन रक्त वाहिन्या होत्या ज्या खूप छोट्या होत्या. त्याच्यामुळे मला हृदयविकाराचा झटका. त्यानंतर मला ज्युपिटर हॉस्पिटलला आणण्यात आला. त्यावेळी आमच्या एका मित्राच्या मदतीने मला एशियन हॉस्पिटलला हलवण्यात आलं. पण, त्या ऑपरेशनवेळी माझी कोणतीही पायाची नस काढण्यात आलेली नव्हती. कारण, या ऑपरेशनमध्ये आपल्या हाताची किंवा पायाची नस काढून शरिरात लावली जाते. हे सगळं पत्नीचं डोकं होतं. ही सगळी गोष्ट तिने कोणालाच सांगितली नाही. पण, तिच्या मनात काय आलं आणि तिने माझे मित्र संजय घागरे यांना फोन लावला. मग त्याने थेट मॉरिशयच्या मित्राला फोन केला. त्यांच्या मदतीने डॉक्टर पांड्यांसोबत संपर्क झाला."
त्यानंतर नंदेश उमप यांनी सांगितलं, "डॉक्टर पांड्याची अपॉइन्टमेन्ट सहसा कोणालाही मिळत नाही. पण,ती माझ्या नशिबाने मिळाली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलावून घेतलं. शिवाय तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातीतल एक ऑपरेशन बाजूला ठेवलं आणि १०-१२ तास माझी सर्जरी चालली. एक दिवस मी व्हेंटिलेटवर होतो. त्यावेळी डॉक्टरांनी यांना सांगितलेलं की तुम्ही आता हात जोडा. यासाठी मी डॉक्टरांचे, माझ्या मित्र-मंडळींचे आभार मानेन. विशेष मी माझी पत्नी आणि लेकीचं आभार मानेने. या दोघी माझ्या मोठा आधार आहेत. दोन महिने दोघ्याजणी माझ्यासोबत होत्या. मला त्यावेळी काय त्रास झाला हे मी सांगू शकत नाही. त्यांनी खूप काही केलं. रात्र-रात्रभर मी झोपायचो नाही. मला गोळ्यांचे साईड इफेक्ट्स झाले होते.तर कदाचित, मी डोळे मिटले असते."
डॉक्टर म्हणाले, की...
नंदेश उमप यांच्या या कठीण काळात पत्नीने मोठी साथ दिली. या मुलाखतीत या प्रसंगाविषयी सांगताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या,"आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे त्यांना हॉर्ट अटॅक आला. त्यानंतर यांची ईसीजी वगैरे केली. मग डॉक्टर बाहेर आल्यानंतर ते म्हणाले, त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय. मग मी प्रचंड टेन्शनमध्ये आले आणि रडायला लागले. पण, माझी मुलगी म्हणाली, सगळं काही ठीक होईल. तू टेन्शन नको घेऊ. मी शांत झाले यांना आतमध्ये बघायला गेले. तेव्हा त्याला म्हटलं की तुला हॉर्ट अटॅक आला.पण, तो एकदम पॉझिटिव्ह होता. असं म्हणत त्यांनी तो भावुक प्रसंग शेअर केला.