'अशी ही बनवाबनवी'च्या रिमेकमध्ये तेजस्विनीला 'हा' अभिनेता हवा लक्ष्याच्या भूमिकेत; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 06:08 PM2023-10-31T18:08:10+5:302023-10-31T18:08:45+5:30

Ashi hi banwabanwi: 'अशी ही बनवाबनवी'चा येणार रिमेक?

marathi-movie-ashi-hi-banwa-banwi-remake laxmikant berde abhinay berde tejaswini pandit | 'अशी ही बनवाबनवी'च्या रिमेकमध्ये तेजस्विनीला 'हा' अभिनेता हवा लक्ष्याच्या भूमिकेत; म्हणाली...

'अशी ही बनवाबनवी'च्या रिमेकमध्ये तेजस्विनीला 'हा' अभिनेता हवा लक्ष्याच्या भूमिकेत; म्हणाली...

मराठी कलाविश्वाच्या इतिहासात 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banavabanavi ) या चित्रपटाचं नाव सुवर्णाक्षराने कोरलं गेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्ष झाले मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटातील संवाद, विनोदी किस्से आणि त्यातील सदाबहार गाणी आजही रसिकप्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. त्यामुळे या सिनेमाचा रिमेक व्हावा किंवा दुसरा पार्ट यावा अशी इच्छा बऱ्याच चाहत्यांनी व्यक्त केली. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सुद्धा या सिनेमाच्या रिमेकविषयी नुकतंच तिचं मत मांडलं. यावेळी बोलत असताना तिने सिनेमातील लक्ष्मीकांत बेर्डेची भूमिका कोणी साकारावी हे सुद्धा सांगितलं.

तेजस्विनीने नुकतीच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या रिमेकमध्ये सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, आणि अशोक सराफ यांच्या भूमिकेत कोणत्या कलाकारांना पाहायला आवडेल हे सांगितलं.

"लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेसाठी मी अभिनयलाच कास्ट करेन. कारण, मला असं वाटतं की तो खूप छान पद्धतीने ती भूमिका वठवू शकेल. तर, अशोक सराफ यांच्या भूमिकेत अमेय वाघला पाहायला आवडेल", असं तेजस्विनी म्हणाली.

दरम्यान, अशी ही बनवाबनवी हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन सिनेमा आहे. या सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आजही या सिनेमाविषयीचे रंजक किस्से, कलाकारांची पडद्यामागील धमालमस्ती ऐकायला प्रेक्षक उत्सुक असतात. 
 

Web Title: marathi-movie-ashi-hi-banwa-banwi-remake laxmikant berde abhinay berde tejaswini pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.