​जोनिता गांधी आणि अॅश किंगचे 'ड्राय डे' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 10:00 IST2017-07-05T04:30:53+5:302017-07-05T10:00:53+5:30

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटातली गाणी बॉलिवूडमधील गायक गात असल्याचे सातत्याने दिसू लागले आहे. हा ट्रेंड आता वाढत असल्याचे ...

Marathi film starring Joneta Gandhi and Ash King's 'Dry Day' debut in Marathi cinema | ​जोनिता गांधी आणि अॅश किंगचे 'ड्राय डे' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

​जोनिता गांधी आणि अॅश किंगचे 'ड्राय डे' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

ल्या काही वर्षांत मराठी चित्रपटातली गाणी बॉलिवूडमधील गायक गात असल्याचे सातत्याने दिसू लागले आहे. हा ट्रेंड आता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वेगळ्या नावामुळे अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या 'ड्राय डे' या चित्रपटासाठी जोनिता गांधी आणि अॅश किंग या मातब्बर गायकांनी ड्युएट गायले आहे. या चित्रपटातून या दोघांनी मराठीत पदार्पण केले आहे. 
आनंद सागर प्रॉडक्शन्सच्या संजय पाटील यांनी 'ड्राय डे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ऑस्कर विजेत्या ए. आर. रेहमान यांचे सहकारी असलेल्या अश्विन श्रीनिवासन यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे अश्विन यांचाही मराठी चित्रपट संगीतातला प्रवास सुरू झाला आहे. जोनिता आणि अॅश यांनी जय अत्रे लिखित 'गार गार कोळशात उठावी ही आग कशी' हे ड्युएट गाणे गायले आहे. पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या ८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जोनिता गांधी हे मोठे नाव आहे. जोतिनाने ओके कन्मनी चित्रपटातले मेंटल मनधिल, दंगल चित्रपटातले गिलहारियाँ, हायवे चित्रपटातलं कहाँ हूँ मैं अशी गाजलेली गाणी गायली आहेत तर अॅश किंगने आएशा सुनो आएशा, हाफ गर्लफ्रेंड चित्रपटातलं बारिश, ऐ दिल है मुश्किल चित्रपटातलं अलीझेह अशी गाणी गायली आहेत. आता 'ड्राय डे' चित्रपटातून हे दोघे मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठीतल्या पहिल्या ड्युएट गाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Ash king

Web Title: Marathi film starring Joneta Gandhi and Ash King's 'Dry Day' debut in Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.