प्रथमेश परबबरोबरच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने गाठला 'व्हॅलेंटाइन डे'चा मुहुर्त, साखरपुड्याचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 08:43 IST2024-02-15T08:42:19+5:302024-02-15T08:43:51+5:30
प्रथमेश परब पाठोपाठ प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने केला साखरपुडा, फोटो समोर

प्रथमेश परबबरोबरच प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने गाठला 'व्हॅलेंटाइन डे'चा मुहुर्त, साखरपुड्याचे फोटो समोर
मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अभिनेत्री शिवानी सुर्वे लग्नबंधनात अडकली. तर १४ फेब्रुवारीला मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला. आता प्रथमेश पाठोपाठ मराठीतील आणखी एका दिग्दर्शकाने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर साखरपुडा केला आहे.
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. जुईली सोनाळकरबरोबर समीर विद्वांसने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी साखरपुडा करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्याचं अभिनंदन केलं आहे.
दिग्दर्शक असण्याबरोबरच समीर एक अभिनेता आणि उत्तम लेखकही आहे. अनेक मराठी सिनेमांचं त्याने लेखन केलं आहे. तर 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'व्हाय झेड', 'धुरळा', 'टाइम प्लीज', 'डबल सीट', 'आनंदी गोपाळ' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची दिग्दर्शनाची बाजू सांभाळत त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.