"तुझा इतिहास खरा की माझा?" हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला "जुनेच घासून गुळगुळीत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:15 IST2025-02-26T13:14:43+5:302025-02-26T13:15:27+5:30
हेमंत ढोमेने एक रोखठोक पोस्ट शेअर केली आहे.

"तुझा इतिहास खरा की माझा?" हेमंत ढोमे स्पष्टच बोलला, म्हणाला "जुनेच घासून गुळगुळीत..."
हेमंत ढोमे (Hemant Dhome) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अभिनेता असण्याबरोबरच हेमंत दिग्दर्शकही आहे. हेमंत त्याच्या निर्भीड स्वभावासाठाहीओळखला जातो. समाजातील अनेक घटनांवर, वेगवेगळ्या मुद्द्यांवर हेमंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मतं व्यक्त करताना दिसतो. अशातच आता त्याने एक रोखठोक पोस्ट शेअर केली आहे.
हेमंत ढोमेने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं लिहलं, "इतिहास वाचून… जाणून… त्यातून प्रभावित होऊन नव्या उर्जेने भविष्य घडवायचं असतं! इतिहासात रमण्यापेक्षा त्यास आदर्श मानून नवा इतिहास रचायचा असतो! पण आपण रमलोय कशात??? तुझा इतिहास खरा की माझा? घडायचंय ते घडून गेलंय, पण पुढे काय घडणार आहे किंवा घडवायचं आहे याचा विचार करणारे दुर्मिळ झाले आहेत… बहूदा त्याचमुळे आजकाल समकालीन आदर्श उरलेले नाहीत! आपण जुनेच घासून गुळगुळीत करीत बसलोय! आता भिती एकच… यामुळे नव्या पिढीला जुन्याचा कंटाळा यायला नको", या शब्दात त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे. हेमंतच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनीदेखील कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इतिहास वाचून… जाणून… त्यातून प्रभावित होऊन नव्या उर्जेने भविष्य घडवायचं असतं!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) February 25, 2025
इतिहासात रमण्यापेक्षा त्यास आदर्श मानून नवा इतिहास रचायचा असतो!
पण आपण रमलोय कशात??? तुझा इतिहास खरा की माझा?
घडायचंय ते घडून गेलंय, पण पुढे काय घडणार आहे किंवा घडवायचं आहे याचा विचार करणारे…
हेमंत ढोमे हा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतो. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'झिम्मा', 'झिम्मा २', 'फसक्लास दाभाडे' या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. हेमंत कलाविश्वात सक्रिय असण्यासोबत सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो.