बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात, PM  नेहरुंनीही केलं होतं कौतुक; बॉलिवूड गाजवणारा 'हा' मराठी अभिनेता कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:54 PM2024-03-05T16:54:59+5:302024-03-05T16:57:57+5:30

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा हा नायक आज यशाच्या शिखरावर  पोहोचला आहे. बड्या- बड्या नायकांबरोबर पडद्यावर झळकणारा हा चिमुरडा आघाडीचा अभिनेता आहे.

marathi cinema legendary actor sachin pilgaonkar acting journey played role in many films pm nehru gave him special gift  | बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात, PM  नेहरुंनीही केलं होतं कौतुक; बॉलिवूड गाजवणारा 'हा' मराठी अभिनेता कोण?

बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात, PM  नेहरुंनीही केलं होतं कौतुक; बॉलिवूड गाजवणारा 'हा' मराठी अभिनेता कोण?

Sachin Pilgaonkar : अगदी लहान वयातच अभिनयाची बाराखडी गिरवत आपल्या अनोख्या अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. ४ वर्षांचा असताना बालकलाकार म्हणून या नायकाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. इतकंच नाही तर देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील या बालकाराच्या अभिनयाची दखल घ्यावी लागली. नेमका हा अभिनेता आहे तरी कोण जाणून घेऊया... 

बॉलिवूडसह मराठी सिनेजगतात आपल्या अभिनयाची जादू पेरणारे हे अभिनेते दुसरे-तिसरे कोणी नसून सचिन पिळगांवकर आहेत. विविध कलांमध्ये पारंगत असणारे सचिन महाराष्ट्राचे महागुरु म्हणून ओळखले जातात.  अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी सिनेसृष्टीवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली तीन दशके आपल्या रसिकजणांचे ते विविध माध्यमातून मनोरंजन करत आहेत. ८० च्या 'अंखियों के झरोखों से', 'नदी के पार' या सिनेमामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

बालकलाकार म्हणून सुरू झालेला सचिन यांचा प्रवास आज ५० वर्ष अविरतपणे सुरू आहे. अभिनयाबरोबरच ते उत्तम गायक आहेत. उत्तम शायर तसेच ते उत्तम डान्सरही आहेत. त्यांच्या बोलण्यात कायम मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेचा प्रभाव असल्याचं दिसतं.

'हा माझा मार्ग एकला' या मराठी सिनेमात त्यांनी केलेल्या कामाची दखल चक्क पंतप्रधानांना घ्यावी लागली. या चित्रपटातील त्यांनी केलेल्या उत्तम अभिनयामुळे त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. त्यावेळी देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन होते. चार वर्षांच्या सचिन पिळगावकर यांना त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच कार्यक्रमात बसलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंना सचिन पिळगावकरांचा निरागसपणा आवडला. त्यांनी सचिन यांना आपल्या मांडीवर बसवलं आणि आपल्याजवळ असलेलं गुलाबाचं फूल त्यांना दिलं होतं.

Web Title: marathi cinema legendary actor sachin pilgaonkar acting journey played role in many films pm nehru gave him special gift 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.