"खूप दु:ख झालं, कारण...", 'सुशीला-सुजीत'ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झाली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:18 IST2025-06-30T12:14:03+5:302025-06-30T12:18:46+5:30

"खूप दु:ख झालं...", 'सुशीला-सुजीत'च्या अपयशावर सोनाली कुलकर्णीची प्रतिक्रया, म्हणाली- "मेहनत घेऊनही..."

marathi cinema actress sonali kulkarni expressed her opinion about response to sushila sujit movie from the audience | "खूप दु:ख झालं, कारण...", 'सुशीला-सुजीत'ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झाली व्यक्त

"खूप दु:ख झालं, कारण...", 'सुशीला-सुजीत'ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झाली व्यक्त

Sonali Kulkarni:  गेल्या काही काळामध्ये मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु, त्यातील काही मोजकेच चित्रपट सिनेरसिकांच्या मनं जिंकण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित सुशील-सुजीत हा चित्रपट १८ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची सगळीकडे तुफान चर्चा होती. परंतु, तिकीटबारीवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. यावर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकतीच सोनाली कुलकर्णीने अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप मराठी' या युट्यूब चॅनेनला मुलाखत दिली. त्यादरम्यान, बॉक्स ऑफिसवर 'सुशीला-सुजीत' चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सोनाली कुलकर्णीने भाष्य केलं आहे. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली,
"सुशीला-सुजीत सिनेमा निवडताना माझा प्रसाद ओकवर विश्वास होता. मला तो एक दिग्दर्शक म्हणून खूप आवडतो. कारण, त्याच्याबरोबर १० वर्षांपूर्वी 'कच्चा लिंबू' मध्ये काम करताना मला खूप मजा आली होती.  शिवाय यावेळी त्याने जो विषय आणला होता तो वेगळ्या धाटणीचा होता आणि त्या भूमिकेमध्ये त्याला मी दिसत होते. प्रसादबरोबर काम करताना दमछाक होते, कारण, तो अनेकदा सीन समजावून सांगताना खूप काही करुन दाखवतो. किंवा त्याला एखादा सीन आवडला तर तो पटकन दाद देतो. असं करुन जेव्हा आपण एक सिनेमा करतो तेव्हा सगळं जमवणं अवघड असतं. स्वप्नीलने जी तयारी केली होती, त्याचा प्रॉपर प्लॅन त्याने आखला होता. हे असं सगळं करुन एखादा सिनेमा केला जातो."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "आता हा चित्रपट का चालला नाही, याबद्दल बोलण्याचा मला हक्क नाही. पण, ती मेहनत घेऊनही सिनेमा जेव्हा पुढच्या आठवड्यात जाऊ शकत नाही. तेव्हा फार वाईट वाटतं. मला तर फेसबुक लाईव्ह करावसं वाटतं की असं नाकारु, कृपया सिनेमे बघा. आताचा काळ हा गोंधळात टाकणारा आहे, असं मला वाटतं. म्हणजे मराठीत सगळीच नाटकं चालत आहेत. मग ती सगळीच नाटकं चांगली आहेत का? की आपण त्यांना फक्त पाठिंबा म्हणून ती नाटकं बघायला जातो. पण, आता नाटकं बघायला लोक जात आहेत आणि सिनेमे बघायला जात नाहीत. याची कारणं शोधण्याची वेळ आली आहे. पण, मला त्याचं खूप दु: ख झालं." असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं. 

Web Title: marathi cinema actress sonali kulkarni expressed her opinion about response to sushila sujit movie from the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.