'वेड लावलंय' गाणं अन्...; रितेश भाऊच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:18 IST2024-12-17T15:17:02+5:302024-12-17T15:18:29+5:30
रितेश देशमुखच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

'वेड लावलंय' गाणं अन्...; रितेश भाऊच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा
Siddharth Jadhav: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि कमाल विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत सिद्धार्थ प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा सोशल मीडियावर एक वेगळाच फॅनबेस आहे. सिद्धार्थ हा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतो. दरम्यान, आज अभिनेता रितेश देशमुखच्या वाढदिवशी अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच त्याने रितेशच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सिध्दार्थ जाधवने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रितेशच्या 'वेडं लावलंय' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतो आहे. त्याच दरम्यान सिद्धार्थ म्हणतो, "रितेश सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही कमाल माणूस. हॅप्पी बर्थडे सर!असा खास मेसेज सुद्दा सिद्धूने या व्हिडीओच्या माध्यमातून रितेशला दिला आहे.
रितेश आणि सिद्धार्थने माऊली सिनेमात एकत्र काम केलं होतं. शिवाय त्यांच्यामध्ये एक चांगला बॉण्ड आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला तसेच सिद्धार्थ जाधवचा डान्स नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
सिध्दार्थ जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायतचं झालं तर अलिकडेच अभिनेता रोहित शेट्टीच्या 'सिंबा', 'सूर्यवंशी', 'सर्कस' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.
तर सध्या तो स्टार प्रवाहवरील 'आता होऊ दे धिंगाणा' च्या तिसरा पर्व होस्ट करताना दिसतो आहे.