अभिनेते संजय नार्वेकरांनी घेतली आलिशान कार, कुटुंबासह केली पूजा; किंमत माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:17 IST2025-06-13T11:15:38+5:302025-06-13T11:17:49+5:30

अभिनेते संजय नार्वेकरांनी खरेदी केली नवीकोरी गाडी, व्हिडीओत दाखवली झलक

marathi cinema actor sanjay narvekar buy new car shared video with fans | अभिनेते संजय नार्वेकरांनी घेतली आलिशान कार, कुटुंबासह केली पूजा; किंमत माहितीये?

अभिनेते संजय नार्वेकरांनी घेतली आलिशान कार, कुटुंबासह केली पूजा; किंमत माहितीये?

Sanjay Narvekar: अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. संजय यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. अलिकडेच ते रानटी चित्रपटात पाहायला मिळाले. दरम्यान, संजय नार्वेकरांच्या चित्रपटांची  नेहमी चर्चा होतेच, मात्र सध्या ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच त्यांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर नवीन गाडीचा व्हिडीओ शेअर करुन त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


संजय नार्वेकर यांनी टोयोटो फॉर्च्युनर ही नवीन गाडी खरेदी केली आहे. आपल्या कुटुंबियांच्या साथीने त्यांनी या नव्या गाडीची पूजा देखील केली. सोशल मीडियावर नव्या गाडीचा खास व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार संजय नार्वेकर यांनी खरेदी केलेल्या कारची किंमत लाखांच्या घरात आहे. बाजारात या गाडीची किंमत जवळपास ३६ लाख इतकी आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून तसेच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

वर्कफ्रंट

अभिनेते संजय नार्वेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर 'वास्तव', 'खबरदार', 'अगं बाई अरेच्चा', 'खबरदार', 'ये रे येरे पैसा', 'टाइमपास', 'सरीवर सरी', 'चष्मेबहाद्दर', 'नऊ महिने नऊ दिवस' अशा चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

Web Title: marathi cinema actor sanjay narvekar buy new car shared video with fans