"आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेरावनं मांडलं धक्कादायक वास्तव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:28 IST2025-06-13T15:07:36+5:302025-06-13T15:28:53+5:30

"आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेराव काय म्हणाला?

marathi cinema actor parth bhalerao reveals shocking reality in film industry says | "आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेरावनं मांडलं धक्कादायक वास्तव 

"आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा...", पार्थ भालेरावनं मांडलं धक्कादायक वास्तव 

Parth Bhalerao: 'भूतनाथ रिटर्न्स', 'किल्ला' या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao) हे नाव मराठी सिनेरसिकांसाठी नवं नाही. बालकलाकार म्हणून अभिनेता पार्थ भालेरावने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. आतापर्यंत त्याने हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले आहे. सध्या पार्थ त्याचा आगामी चित्रपट आंबट शौकीनमुळे चर्चेत आहे. आजा १३ जूनला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत पार्थने केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत. 

अलिकडेच अभिनेता पार्थ भालेराव याने 'सेलिब्रिटी कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव मांडलं आहे. त्यादरम्यान अभिनेत्याने त्याच्या मित्राचा एक किस्सा सांगत म्हणाला," कलाक्षेत्र हे बेभरवशाचं आहे, आम्हाला पेमेंट स्लिप दिली जात नाही. त्यामुळे आम्हाला कोणी लोन देत नाहीत, क्रेडिट कार्डसुद्धा पहिल्याची क्षमता संपली की आम्ही दुसरं घेतो. ४० लोकांमधून एकजण कथानक लिहितो पण त्यासाठी योग्य निर्माता भेटेल की नाही हे त्याला माहित नसतं, कलाकारालाही योग्य निर्माता भेटेल की नाही हे माहीत नसतं. यातून कसं तरी एक काम मिळून जातं. त्यात आपली निवड होणं हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. असा खुलासा अभिनेत्याने केला. 

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "आपलं काम कितीही उत्तम असलं तरी या गोष्टी आपल्या हातात नसतात. अशाच प्रकरणामध्ये आमचा एक मित्र अडकला होता. ज्याला सगळेचजण ओळखतात. त्याला सतत असं वाटायचं की आपल्याला मला हे काम जमत नाही. तो आमच्यासोबत यायचा बसायचा पण तो आतल्या गोष्टी कधीच बोलला नाही. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून जात असतो. मुलं फारसं व्यक्त होत नाहीत, मुलींच्या इमोशन्स लगेचच ग्राह्य धरल्या जातात. मुलांना तेवढं ऐकून घेतलं जात नाही. त्या मित्राने एक दिवस कुठलंतरी कीटकनाशक खाल्लं. सुदैवाने तो यातून वाचला. त्याचं असं आहे की तो एकुलता एक आहे. पण. त्याने असं केल्याने प्रत्येकाला धक्का बसला होता. हे या इंडस्ट्रीचं वास्तव आहे." असा खुलासा त्याने केला आहे. 

Web Title: marathi cinema actor parth bhalerao reveals shocking reality in film industry says