"तू प्राजक्ता माळीला इन्स्टावर फॉलो का करत नाही?", गश्मीर महाजनीला चाहत्याचा थेट प्रश्न, अभिनेत्याने दिलं 'हे' मजेशीर उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 10:12 IST2025-11-09T10:07:31+5:302025-11-09T10:12:21+5:30
"तू प्राजक्ता माळीला इन्स्टावर फॉलो का करत नाही?", गश्मीर महाजनीला चाहत्याचा थेट प्रश्न,अभिनेत्याने दिलं 'हे' उत्तर , म्हणाला...

"तू प्राजक्ता माळीला इन्स्टावर फॉलो का करत नाही?", गश्मीर महाजनीला चाहत्याचा थेट प्रश्न, अभिनेत्याने दिलं 'हे' मजेशीर उत्तर, म्हणाला...
Gashmeer Mahajani: सध्याच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. थोडक्यात, प्रत्येकाचं व्यक्त होण्याचं हे एक माध्यम बनलं आहे. अनेकजण आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स यामार्फत शेअर करत असतात. त्यात कलाकारही कुठे मागे नाहीत. मराठी कलाविश्वातील अनेक हल्ली सोशल मीडियावर तितकेच सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. या माध्यमावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतात. इतकंच नाहीतर अनेकजण सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद देखील साधतात. अशातच नुकताच मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत संवाद साधला. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.यादरम्यान, गश्मीरला एका चाहत्याने अनपेक्षित प्रश्न विचारला, ज्याचं त्याने जे उत्तर दिलं ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अलिकडेच गश्मीरने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' घेतलं.त्यावेळी अभिनेत्याला एका नेटकऱ्याने थेट प्राजक्ता माळी संदर्भात प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर गश्मिरने दिलेल्या उत्तराने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या सेशनदरम्यान गश्मिरला तू प्राजक्ता माळीला इन्स्टाग्रामवर फॉलो का करत नाहीस तुम्ही दोघांनी एकत्र सिनेमा केला आहे. नेटकऱ्याच्या या प्रश्नाचं अभिनेत्याने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. गश्मीरने या प्रश्नावर उत्तर देत म्हटलं की, 'प्राजक्ता प्लीज त्यांना सांग, तुला फॉलो का करत नाही' असं म्हणत अभिनेत्यानं प्राजक्ताला टॅग केलं आहे. दरम्यान, गश्मीरच्या या रिप्लायवर अद्याप प्राजक्ताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, प्राजक्ता माळी आणि गश्मीरने फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांचा हा चित्रपट चांगला गाजला होता.शिवाय चित्रपटांचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही तोंडभरून कौतुक केलं होतं. मात्र, तरीही हे दोघं एकमेकांना सोशळ माीडियावर फॉलो करत नाही, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतंय.