Maharashtra Day 2022 : गर्व या मातीत जन्मल्याचा..., मराठी कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 13:46 IST2022-05-01T13:41:37+5:302022-05-01T13:46:25+5:30

Maharashtra Day 2022 : राज्यातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आपले सेलिब्रिटी तरी आज कसे मागे राहतील.

marathi celebrities wishing on maharashtra day 2022 | Maharashtra Day 2022 : गर्व या मातीत जन्मल्याचा..., मराठी कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

Maharashtra Day 2022 : गर्व या मातीत जन्मल्याचा..., मराठी कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

आज 1 मे हा महाराष्ट्राचा स्थापना दिवस. हा दिवस दरवर्षी राज्यात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राविषयी असणारं प्रेम, आदर आणि अभिमान याची जाणीव करून देणाऱ्या या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा देत आहे. मराठी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. अनेक मराठी कलाकारांनी आपल्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने एक व्हिडीओ शेअर करत, महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या पोवाड्याच्या ओळी लिहित त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय संध्याकाळी अभिमानाची गोष्ट घेऊन येतोय, असे संकेतही दिले आहेत.

मराठमोळी कन्या व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुख याने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत ट्विट केलं आहे. गर्व या मातीत जन्मलेचा..., असं त्याने लिहिलं आहे.

साद घालते माय मराठी, तेथेची धन्य झालो... गतजन्मीचे पुण्य म्हणोनी महाराष्ट्र देशी जन्मा आलो, असं म्हणत अभिनेता जितेन्द्र जोशीने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने खास मराठमोळया लुकमध्ये महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही पोस्ट लिहित महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आचार्य अत्रेंच्या काही ओळी तिने शेअर केल्या आहेत.

Web Title: marathi celebrities wishing on maharashtra day 2022