मराठी कलाकार सोशलमिडीयावर हीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 17:08 IST2016-09-02T11:36:45+5:302016-09-02T17:08:24+5:30

Exculsive -  बेनझीर जमादार गेले दोन वर्ष झाले स्वप्नील जोशी हा एकमेव मराठी अभिनेता होता की, त्याचे ट्वििटर अकाऊंड व्हेरीफाय ...

Marathi artist Social Media on Heat | मराठी कलाकार सोशलमिडीयावर हीट

मराठी कलाकार सोशलमिडीयावर हीट

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">Exculsive -  बेनझीर जमादार

गेले दोन वर्ष झाले स्वप्नील जोशी हा एकमेव मराठी अभिनेता होता की, त्याचे ट्वििटर अकाऊंड व्हेरीफाय झाले होते. मात्र आता, सोशलमिडीयावर वापरण्याचा ट्रेंड मराठी कलाकारांमध्ये रूजू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण स्वप्नीलच्या पाठोपाठ आता अनेक मराठी कलाकारांचे ट्वििटर अकाउंट व्हेरीफाय होत असल्याचे दिसत आहे. अशाच काही मराठी कलाकारांचा घेतलेला हा आढावा.

स्वप्नील जोशी: मराठी इंडस्ट्रीमध्ये ट्वििटर अकाऊंट व्हेरीफाय होणारा स्वप्नील जोशी हा पहिला अभिनेता आहे. त्यामुळे साहजिकच चित्रपटांप्रमाणेच सोशलमिडीयावरदेखील स्वप्नील हा हिरो बनला आहे. त्याचे आतापर्यत, ३६.८ के फॉलोव्हर्स असल्याचे दिसत आहे. 

 
सई ताम्हणकर: प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे देखील ट्वििटर अकाऊंट काही महिन्यांपूर्वीच व्हेरीफाय करण्यात आले आहेत. सईचे आतापर्यत ४९.३ के फॉलोव्हर्स आहेत. ट्वििटरवर देखील सईने आपला जलवा कायमस्वरूपी ठेवला आहे 

 
रवी जाधव: मराठी इंडस्ट्रीला सुपरहीट चित्रपट देणारे दिग्दर्शक रवी जाधव हे ट्वििटरवर देखील चित्रपटाप्रमाणेच हिट झालेले दिसत आहेत. कारण त्यांना प्रेक्षकांनी ट्वििटरवरदेखील भरभरून प्रेम दिले आहेत. ट्वििटरवर त्यांचे ६७.७ के फ्लॉलोवर्स असल्याचे पाहायला मिळत आहेत. एवढे फॉलोव्हर्स असणारे ते मराठी इंडस्ट्रीतील पहिलेच दिग्दर्शक आहेत. 

 
उर्मिला कोठारे: अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे देखील नुकतेच ट्वििटर अकाऊंट व्हेरीफाय झाले आहे. या मॅगो डॉलीचे देखील आतापर्यत, २४.८ के  फॉलोव्हर्स असल्याचे दिसत आहेत. 

 
संजय जाधव: दिग्दर्शक संजय जाधव यांचे तर ट्वििटर अकाऊंट नुकतेच व्हेरीफाय करण्यात आले आहेत. प्रेक्षकांच्या हा लाडका दिग्दर्शक ट्वििटरवर देखील आपली दुनियादारी करण्यात यशस्वी झाला आहे. संजय याचे ट्वििटवर दोन हजार चारशे फॉलोव्हर्स असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 
स्पृहा जोशी: आपल्या अभिनय व कवितेने प्रेक्षकांचे मनं जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी देखील ट्वििटरवर हिट असल्याचे दिसत आहेत. स्पृहाचे  २९.८ के  फॉलोव्हर्स आहेत. ट्वििटरवरील तिच्या कवितादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. 



सिध्दार्थ जाधव: सिध्दार्थच्या गेला उडत या नाटकाचे प्रमोशन सोशलमिडीयावर झक्कास पध्दतीने चालू असल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या एकापेक्षा एक नाटकाच्या प्रमोशन पध्दतीला प्रेक्षकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे २४.३ के फॉलोव्हर्स आहेत. 

 
मराठी इंडस्ट्रीतील या कलाकारांचे व्हेरीफाय झालेले अकाऊंट हे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पण या इंडस्ट्रीतील असे ही कलाकार आहेत की, ते वास्तविक जीवनात लोकप्रि़य आहेत पण सोशलमिडीयावर मात्र मागे पडले आहेत. यामध्ये प्रि़या बापट, अमृता खानविलकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, उमेश कामत, अंकुश चौधरी यांचा समावेश आहे. 

Web Title: Marathi artist Social Media on Heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.