योगिता चव्हाण करणार 'राडा'; अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 14:32 IST2022-08-26T14:32:21+5:302022-08-26T14:32:49+5:30

Yogita chavan:सध्या सोशल मीडियावर 'राडा' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात ती रावडी लूकमध्ये दिसून येणार आहे.

marathi actress Yogita Chavan upcoming marathi movie Rada | योगिता चव्हाण करणार 'राडा'; अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

योगिता चव्हाण करणार 'राडा'; अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण. सोशल मीडियावर सक्रीय असलेली योगिता सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर योगिता लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती रावडी लूकमध्ये दिसून येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर 'राडा' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. त्यानंतर आता या चित्रपटातील भूमिकांवरील एक एक पडदा दूर होत आहे. यात योगिताच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. 

फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटात योगिता महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आला आहे. त्यामुळे आता तिच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान,राम शेट्टी निर्मित 'राडा' या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश सोपान नरवाडे यांनी केलं आहे.  हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: marathi actress Yogita Chavan upcoming marathi movie Rada