'भारत' चित्रपटात झळकणार ही मराठी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 20:10 IST2019-03-04T20:09:31+5:302019-03-04T20:10:11+5:30
ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

'भारत' चित्रपटात झळकणार ही मराठी अभिनेत्री
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हिंदी व मराठी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ती सलमान खान अभिनीत 'भारत' चित्रपटात झळकणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच ट्विटरवर दिली आहे.
सोनाली कुलकर्णीने ट्विटरवर दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबतचा फोटो शेअर करीत भारत चित्रपटात ती काम करत असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
My director😎how cool it is to work with you dear @aliabbaszafar 🤗 three cheers💕 May our @Bharat_TheFilm create history, yet again!!! Aamen.. pic.twitter.com/ikmilTyOCB
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 3, 2019
मिड-डेच्या रिपोर्ट नुसार, सलमान-कॅटरिनाच्या 'भारत' सिनेमाची शूटिंग एक इमोशनल सीन शूट करुन संपली आहे. सिनेमाची शूटिंग लुधियाना, माल्टा, दिल्ली आणि अबू धाबीमधले सुंदर लोकेशन्सवर करण्यात आली आहे. शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत करण्यात आले. हा इमोशन सीन कॅटरिना आणि सलमानवर शूट करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.