'घर भाडं नको त्या बदल्यात..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे घरमालकाने केली होती शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:58 IST2023-03-20T13:57:04+5:302023-03-20T13:58:01+5:30

Marathi actress: 'त्याने माझ्या प्रोफेशनवरुन मला जज केलं. किंवा, माझी आर्थिक स्थिती बेताची होती त्यामुळे त्याने हा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं', अभिनेत्रीला आला भयानक अनुभव

marathi actress tejaswini pandit reveals her house owner asked for favours | 'घर भाडं नको त्या बदल्यात..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे घरमालकाने केली होती शरीरसुखाची मागणी

'घर भाडं नको त्या बदल्यात..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे घरमालकाने केली होती शरीरसुखाची मागणी

मराठी कलाविश्वात आज अनेक अभिनेत्री यशस्वीरित्या वावरतांना दिसतात. मात्र, या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सोप्पा नव्हता. अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊच, स्ट्रगल यांसारख्या दिव्यातून पार पडावं लागलं आहे. सध्या अशाच एका नावाजलेल्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एकेकाळी या अभिनेत्रीला भाड्याच्या घरात राहताना घरमालकाने चक्क सेक्शुअल फेवर केला होता. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं आहे. 

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) हिच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती यशस्वी उद्योजिकादेखील आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात तिला बराच स्ट्रगल करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने तिला आलेल्या अनुभवावर भाष्य केलं आहे.

"हा अनुभव मला २००९-१० च्या काळात आला होता. त्यावेळी मी पुण्यात सिंडगड रोडवर एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहात होते. त्याकाळात माझे केवळ १-२ सिनेमेच रिलीज झाले होते. मी ज्या इमारतीमध्ये राहात होते ती इमारत एका नगरसेवकाची होती", असं तेजस्विनी म्हणाली.

पुढे म्हणाली, "मी घराचं भाडं देण्यासाठी घरमालकाच्या ऑफिसमध्ये गेले होते. मात्र, त्याने भाड्याच्या ऐवजी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याचं हे वक्तव्य ऐकून माझा प्रचंड संताप झाला आणि मी टेबलावर ठेवलेलं पाणी त्याच्या तोंडावर फेकलं. हे सगळं करण्यासाठी मी या क्षेत्रात आलेले नाही. नाहीतर या इमारतीमध्ये राहायला आलेच नसते", असं तेजस्विनीने ठणकावून सांगितलं.

"त्याने माझ्या प्रोफेशनवरुन मला जज केलं. किंवा, माझी आर्थिक स्थिती बेताची होती त्यामुळे त्याने हा प्रश्न विचारण्याचं धाडस केलं. पण, हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला", असंही तिने सांगितलं.

दरम्यान, तेजस्विनी पंडित मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अग्गंबाई अरेच्चा, फॉरेनची पाटलीन, सिंधूताई सकपाळ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
 

Web Title: marathi actress tejaswini pandit reveals her house owner asked for favours