लेटेस्ट फोटोशूटमध्ये तेजस्विनीने दिल्या दिलखेचक अदा; साडीतील बोल्डनेसमुळे होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:07 IST2022-08-18T15:06:25+5:302022-08-18T15:07:16+5:30
Tejaswini pandit: फोटोशूटमधील एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये तेजस्विनीने दिल्या दिलखेचक अदा; साडीतील बोल्डनेसमुळे होतीये चर्चा
मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि तितकीच बिंधास्त अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित ( tejaswini pandit). दमदार अभिनयासह तेजस्विनी तिच्या बिंधास्त स्वभावामुळेही ओळखली जाते. कोणतीही भूमिका उत्तमरित्या साकारणारी तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली तेजस्विनी कायम चाहत्यांच्या भेटीला नवनवीन पोस्ट घेऊन येत असते. यात बऱ्याचदा तिचं फोटोशूट चर्चेचा विषय ठरत असतं. यावेळीदेखील तेजस्विनीने असंच एक सुंदर फोटोशूट केलं असून यातील एक फोटो शेअर करत तिने बॅकग्राऊंडला लक्ष वेधून घेणारं गाणं ठेवलं आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्विनीने लाल रंगाची साडी नेसली असून ती सोफ्यावर पालथी झोपली आहे. यावेळी तिने सोडलेले मोकळे केस तिचं सौंदर्य अजून खुलवत आहेत.
दरम्यान, तेजस्विनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये ती झळकली आहे. अलिकडेच तिची रानबाजार ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.